न्हावरेफाटा जवळ ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Image may contain: 1 person, standing, tree and outdoorशिरूर,ता.८ मार्च २०१९(प्रतिनिधी) : दुचाकीस मागून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाल्याची घटना घडली.या प्रकरणी विकास दरेकर यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.अपघात झाल्यानंतर शिरुर पोलीसांनी तत्काळ वाहतुक सुरळीत केली.

या अपघातात विठाबाई दरेकर(वय -62, रा.करंदी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंदी येथील नाथु बाबूराव दरेकर व विठाबाई दरेकर हे दुचाकी (एम.एच.12 जी.एस.1983) वरून पिंपळनेर येथे चालले होते.न्हावरे फाटा जवळ आले असता पाठीमागून येणारा ट्रक  क्रमांक एम.एच.४ सी.ए.२२८५ ने मागून दुचाकीला धडक दिली.

या अपघातात विठाबाई यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर नाथु दरेकर हे जखमी झाल्याने त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले. या अपघातामुळे पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक काही काळ कोंडी झाली होती.शिरूर पोलीस स्टेशन ला खबर मिळताच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करनसिंग जारवाल,सुदाम खोडद,सुरेश नागलोत यांनी घटनास्थळी धाव घेउन तत्काळ वाहतूक सुरळीत करण्यात आली.या अपघातप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे वैभव मोरे हे करत आहेत.

त्याच जागी दुसरा अपघात...
गेल्या दोन वर्षांपुर्वी न्हावरे फाटा येथे कानिफनाथ  हॉटेल समोर मामा-भाचीचा जागीच मृत्यु झाला होता.त्याच ठिकाणी पुन्हा हा अपघात घडला असुन या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कारेगावला अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
दुभाजकाजवळून अचानकपणे वळलेल्या जेसीबीच्या दातऱ्यांच्या बकेटवर आदळून सुरेश बाबू धरणे (वय 32, रा. धनगरवाडा, कर्डेलवाडी, ता. शिरूर) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पुणे-नगर रस्त्यावर कारेगावजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर तो पळून गेला. सुरेश धरणे हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे-नगर रस्त्याने रांजणगाव एमआयडीसीकडे चालले होते. दरम्यान, या रस्त्यावरील कारेगाव नजीकच्या हॉटेल तोरणाजवळ पुण्याहून नगरच्या दिशेने चाललेला जेसीबी, तुटलेल्या रस्ता दुभाजकाजवळून अचानक वळल्याने धरणे यांची दुचाकी जेसीबीवर जाऊन आदळली. त्यात जेसीबीच्या बकेटचे दात्रे त्यांच्या शरीरात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या