शिरूर लोकसभेसाठी 29 एप्रिलला मतदान; 23 मेला निकाल

Image may contain: one or more people

शिरूर, ता. 11 मार्च 2019: पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी (ता. 10) दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा  रविवारी जाहीर केल्या. देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण चार लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात यंदा काहीही झाले तरी विजय मिळवायचा, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. त्यासाठी शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षात आणून निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादीने प्रारंभ केला आहे. डॉ. कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी अटकळ आहे. शिरूरमधील चित्र येत्या आठवडाभरात स्पष्ट होईल.

प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार ?
सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी निश्‍चित झाल्यावर इच्छुकांना सुमारे 30-35 दिवस प्रचारासाठी मिळतील. मात्र, काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळणार का, याकडे इच्छूक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान
पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान

शिरूर लोकसभेसाठी मतदानः 29 एप्रिल
मतादरसंघनिहाय मतदारांची संख्याः शिरूरः 21 लाख 11 हजार 465

असा असेल निवडणूक कार्यक्रम
 • अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून
 • अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
 • अर्ज छाननी – 26 मार्च
 • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
 • मतदानाची तारीख – 11 एप्रिल
 • निकाल – 23 मे
एक नजर शिरूरवर
 • विद्यमान खासदारः शिवाजीराव आढळराव पाटील
 • पक्षः शिवसेना
 • 2014 मध्ये मिळालेली मते : 6,43,415

प्रलंबित प्रश्न
 • स्थानिकांना रोजगार
 • प्रामुख्याने रस्त्याचे प्रश्न गंभीर
 • पुणे-नगर वाहतूकची वाहतूक कोंडी
 • ऐतिहासिक स्थळांचा विकास
सोशल मीडियावरही लक्ष
उमेदवारी अर्जात निवडणूक आयोगाकडून काही बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोशल मीडियाच्या वापरासंदर्भातील माहितीदेखील उमेदवारांकडून भरून घेतली जाणार आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. आवश्‍यक वाटल्यास त्यांचा खर्चदेखील उमेदवाराच्या निवडणुकीच्या खर्चात ग्राह्य धरला जाणार आहे. तसेच यावर "वॉच' ठेवण्यासाठी स्वतंत्र टदम नेमण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या