मतदार यादीत तुमचे नाव आहे का? नसेल तर पहा...

No photo description available.
शिरूर, ता. 11 मार्च 2019 : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे आताच पाहा. कारण ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आताच पाहा.

मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो.

असे पहा आपले नाव :
http://103.23.150.139/marathi/
https://ceo.maharashtra.gov.in/

असे पहा आपले नावः
* वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण इलेक्शन कमिशनच्या साईटवर जाल.
* साईटवर गेल्यानंतर Name Wise आपल्यासमोर आणि ID Card Wise हे दोन पर्याय उपलब्ध असतील.
* त्यातील Name Wise पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे District आणि Assembly असे दोन पर्याय समोर येतील.
* त्यापैकी Assembly हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.
* त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो Select District
* त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
* त्या पुढचा पर्याय Select Assembly
* म्हणजेच तुमचा मतदारसंघ.
* या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.
* त्यानंतर तुमचे नाव टाका. त्यानंतर तुमचे आडनाव टाका.
* त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.
* हे सर्व रकाने भरल्यानंतर Search या पर्यायवर क्लिक करा.
* ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल.
* याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहता येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या