आचारसंहितेचे पालन करा अन्यथा...

No photo description available.शिरूर,ता.१२ मार्च २०१९(प्रतिनिधी) : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिला असून (29 एप्रिल) रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी तयारी पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

शिरूर येथे पंचायत समिती नगरपालिका यांच्या अधिकारी पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन चोवीस तासाच्या आत जेथे कुठे राजकीय पक्षाचे चिन्ह,  झेंडे,  बोर्ड असतील तर ते ताबडतोब काढण्याचे आदेश यावेळी अधिकारी वर्गाला दिले असून,  राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहीते संदर्भात माहिती देऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे सांगण्यात आले असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी देऊन, शिरूर लोकसभा मतदार संघातील पूर्ण तयारी झाली असून,  शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण तीन लाख  57 हजार 263 मतदार असून यामध्ये 1लाख 86हजार 398  पुरुष मतदार आहेत तर एक लाख 70 हजार 865 महिला मतदार आहेत. मतदारसंघांमध्ये हजार पुरुषांमागे 917 महिला मतदार असल्याचे यावेळी त्यांनी सांगून मतदारसंघांमध्ये 97 पॉइंट सत्तावीस टक्के मतदारांना मतदान ओळखपत्र देण्यात आले आहे. या मतदारसंघामध्ये दृष्टीहिन चाळीस मतदार मतिमंद 131 मतदान व इतर दिव्यांग  367 असे एकूण 600 मतदार आहेत. या सहाशे मतदारांना व्यवस्थित व सोप्या  पद्धतीने मतदान करण्यासाठी  व्यवस्था केली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघासाठी  198 मतदारसंघामध्ये 385 मतदान केंद्र असणार असून त्यासाठी  एकूण 2600 कर्मचारी,  2000 कर्मचारी मतदान केंद्रावर असणार असून 385 पोलीस कर्मचारी असणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करून घेण्यासाठी 29 झोन  व 29 झोनल  अधिकारी नेमले असून,  मतदान केंद्रावर जाण्यासाठी 69 एसटी बस , सहा मिनी बस , सहा जीप व्यवस्था करण्यात आली असून ,  मतदाना अगोदर मतदान केंद्रावर अधिकारी नेमणूक केली आहे त्यांच्यासाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठीची जागा राहण्याची सुविधा ही करण्यात आली असून शिरूर तालुक्यातील करडे,  आंबळे , आलेगाव पागा,  चव्हाणवाडी, सणसवाडी , कोरेगाव,कासारी ही मतदान केंद्र संवेदनशील असून, हवेलीतील काही मतदार केंद्राचा त्यात समावेश  असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले.

जर कोणी आचारसंहितेचा भंग केला व त्यासाठी तक्रार असेल तर त्यासाठी  शिरूर तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र वेगळा कक्ष केला असून त्यांच्या प्रमूख  मुख्याधिकारी  अँलिस पोरे असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणुकीचा  काळात  सभा,  वाहने,  पोलीस, स्पीकर त्याच्या परवानग्या  घेण्यासाठी पक्षांच्या  कार्यकर्त्यांची धावपळ होऊ नये म्हणून शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी  एक खिडकी योजना सुरू केली असून त्यातूनच सर्व परवानग्या मिळणार आहेत तशी व्यवस्था केली आहे.

सभा काळामध्ये,  प्रचारादरम्यान,  असणारे स्पीकर खुर्च्या इतर व्यवस्था,  सभेचा खर्च,  बोर्ड याची सर्व माहिती निवडणूक खात्याच्या कडून  घेतली जाणार आहे. असा खर्चाचा तपशील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देण्याचे बंधनकारक आहे. या खर्चाची  निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून पडताळणी होणार असल्याचे सांगितले.या निवडणुकीसाठी शिरूर  हवेलीमध्ये 3 चेक पोष्ट असणार तर पाच भरारी पथके ,तीन स्थिर पथके असणार आहे.त्यात  व्हिडिओ कॅमेरा,  एक अधिकारी पोलीस कर्मचारी , महिला पोलीस किंवा  महिला कर्मचारी  असणारा तुन निवडणुकी काळात पैशाचा वापर वगैरे होऊ नये यासाठी त्यावर हे पक्के लक्षात ठेवून असणार आहेत.

शिरूर मतदार संघासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून , निवडणूक अधिसूचना प्रसिध्द दिनांक 2/4/2019,उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 9/4/2019,उमेदवारी अर्ज छाननी 10/4/2019,उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12/4/2019,मतदान दिनांक 29/4/2019,मतमोजणी 23/5/2019 होणार आहे .निवडणूक प्रक्रिया 27/5/2019 पूर्ण होणार असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या