समाजात अवयवदानाबाबत जनजागृती व्हावीः कोमल पवार

Image may contain: 1 personशिरुर,ता.१२ मार्च २०१९(सतीश केदारी) : अवयवदान व अवयवप्रत्यारोपनाबाबत समाजात अनभिज्ञता असुन अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे मत कोमल गोडसे-पवार यांनी व्यक्त केले.

Image may contain: 3 people, people standingशिरुर येथे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित विशेष  कार्यक्रमात पवार या बोलत होत्या.दोन्ही ह्रदय व फुफ्फुस प्रत्यारोपनच्या यशस्वी पार पडुन मृत्युच्या जबड्यातुन बाहेर पडलेल्या व संपुर्ण महाराष्ट्रभर अवयवदानासाठी जनजागृती करणा-या कोमल गोडसे पवार यांनी, समाजात अवयवदानाबाबत अनभिज्ञता असुन मोठे गैरसमज असल्याचे सांगत स्ञियांचे यामध्ये जास्त प्रमाण आढ़ळत असल्याचे सांगत जीवंतपणी व मृत्युपश्चात एकदा तरी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. समाजात अवयवदानाबाबत मोठे गैरसमज असुन अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालुन वृक्षपुजन करण्यात आले तसेच दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी संस्थेचा गेल्या तीन वर्षांचा प्रवास व आलेले अनुभव मांडले.या कार्यक्रमाला उर्जा उद्योगसमुहाचे प्रमुख प्रकाशशेठ कुतवळ,अॅड.मृदुला सहस्ञबुद्धे,डॉ.मनिषा चोरे,दत्ता केदारी,नगरसेविका रोहिणी बनकर,उज्वला वारे,मनिषा कालेवार आदी मान्यवर तसेच पालक शिरूर शहरातील नागरिक उपस्थित होते.संस्थेच्या खजिनदार डॉ.मनिषा चोरे यांनी आभार मानले.
जी मुले आयुष्यात कधीच व्यक्त होउ शकली नसती अशा मुलांनी व्यासपीठावर जेव्हा नृत्यांवर धम्माल उडवुन दिली तेव्हा उपस्थितांनी ही टाळया,शिट्टया अन वन्स मोअर करत सर्व गाण्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.घनन घन या गाण्यात विशेष मुलांनी विहिर अन घर,झाडे साकार करुन त्यातुन दुष्काळाची दाहकता व पावसाची गरज यावर नृत्य सादर केले.तर फिर भी दिल है हिंदुस्तानी या गाण्यातुन एकतेचा संदेश दिला.खंडेराया झाली माझी दैना अन काठीन घोंगडं घेउ द्या कि रं या गाण्यांवर केलेल्या बहारदार नृत्यांनी उपस्थितांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत साथ दिली.जी मुले आयुष्यात कधीच व्यक्त होउ शकत नाही,जी कधीच सर्वसामान्य मुलांप्रमाणे नृत्य करु शकत नाहीत परंतु व्यासपीठावर विशेष मुलांनी अक्षरश: धम्माल उडविली.या मुलांचे नृत्य पाहताना अनेकजण भारावुन गेले होते.
या झालेल्या कार्यक्रमात अवयवदानासाठी संपूर्ण राज्यभरात कार्य करणाऱ्या कोमल गोडसे पवार यांना संस्थेच्या वतीने आदर्श नारी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.तर आदर्श पालक म्हणून विकास पाटील तसेच आदर्श सेविका म्हणून यमुना ठोंबरे यांना गौरविण्यात आले.आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन च्या कार्यास हातभार लावणाऱ्या दात्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडून प्रोजेक्टर भेट...
आकांक्षा संस्थेतील विशेष मुलांना ई-लर्निग ची अडचण असायची.तसेच वार्षिक कार्यक्रमात प्रोजेक्टर ची गरज भासायची.हीच गरज ओळखून शिरूर वरून नुकतीच सातारा जिल्ह्यात वाई येथे नुकतेच बदलून गेलेले तहसीलदार रणजित भोसले यांनी संस्थेस प्रोजेक्टर भेट म्हणून दिले.त्यांचेही आभार मानण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या