निमोणे ग्रामस्थांचा असाही पुणे जिल्हयात आदर्श

Image may contain: one or more people, people sitting and indoorनिमोणे,ता.१४ मार्च २०१९(प्रतिनीधी) : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील निमोणे गावाने पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्याप्रती सामाजिकतेचे भान जपत नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
Image may contain: one or more people and people standingपुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहिद झाले होते.या शहिदांना श्रद्धांजली म्हणुन निमोणे गावाने गावची याञा साजरी करायची नाही असा निर्णय घेतला होता.त्यानुसार याञाही अत्यंत साधेपणाने साजरी केली. व याञेचा शिल्लक खर्च शहिद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे ठरवले.

त्यानुसार(दि.१३)रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले वीर जवान स्व.संजयसिंह राजपूत यांच्या मलकापूर जि.बुलढाणा येथील घरी निमोणे ग्रामस्थांनी भेट देऊन निमोणे गावची यात्रा रद्द करून शिल्लक राहिलेली वर्गणीची रक्कम ९० हजार रुपये शहिद जवानाच्या वीर मातेकडे सुपुर्द केली.तर वीरजवान नितीन राठोड यांच्या गोवर्धननगर(वीर पांगारा),ता.लोणार,जि.बुलढाणा या गावी भेट देउन शहिद राठोड यांच्या कुटुंबियांडे ९० हजार रुपये मदत  सुपर्द केली.

याबाबत निमोणे गावचे यात्रा कमिटीप्रमुख श्रीधरअण्णा साळुंके यांनी सांगितले कि, निमोणे गावाने शहिदांच्याप्रती सामाजिकता जपुन दोन्ही शहिदांच्या कुटुंबियांना मिळुन सुमारे १ लाख ८० हजार इतकी आर्थिक मदत केली.या मध्ये गावातील सर्वांचे योगदान मोठे असुन गावाने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.

शिरुर तालुक्यातील निमोणे गावात तरुण,ज्येष्ठ व सर्व वयोगटातील युवक,ग्रामस्थ एकञ येत असुन यानिमित्ताने गावाने सामाजिक सलोखा,एकोपा व सद्भावनेचे तसेच सामाजिकतेचे नवे पैलु या निमित्ताने पाडल्याने तालुक्यात या गावाचे मोठे कौतुक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या