शिरुरला नेते विरुद्ध अभिनेते लढत रंगणार

Image may contain: 2 people, beardशिरुर,ता.१५ मार्च २०१९(सतीश केदारी) : गेल्या काही महिन्यांपासुन राज्यभर चर्चेत असणा-या शिरुर लोकसभा मतदार संघात अखेर खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना शह देण्यासाठी अभिनेते अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहिर केली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात गेल्या अनेक महिन्यांपासुन माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या पासुन अनेक मातब्बरांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु होत्या.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही माझ्याकडे चार-पाच मातब्बर उमेदवार असल्याचे सांगत उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवलेला होता.राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती.दरम्यानच्या काळात विलास लांडे यांनीही जोरदार तयारी करत प्रबळ उमेदवार असल्याचे दाखवुन दिले होते.पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचेही नाव चर्चेत होते.परंतु अखेर राष्ट्रवादीने अभिनेते अमोल कोल्हे यांच्यानावावर शिक्कामोर्तब करत उमेदवारी फिक्स केली आहे.

शिरुर लोकसभेत गेल्या तीन टर्म मध्ये खासदार शिवाजी आढ़ळराव पाटील हे निवडुन आले असुन यावेळी राष्ट्रवादीने शह देण्यासाठी अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे शिरुर लोकसभेच्या निवडणुकित प्रथमच नेता विरुद्ध अभिनेता अशी निवडणुक होणार असुन शिवाजी आढ़ळराव यांचा चौकार रोखणार का ? कि राष्ट्रवादीला पुन्हा हार पत्कारावी लागणार याबाबत येणारा काळच ठरवणार असला तरी हि लढत चांगलीच रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या