शिरुरला 'टगेगिरी' करणा-यांची गय करणार नाही: सारंगकर

Image may contain: 1 person, smiling, sittingशिरुर,ता.१६ मार्च २०१९(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत टवाळखोरी करणा-या सख्याहरींवर कडक कारवाई करणार असल्याचे शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी बोलताना सांगितले.

शिरुर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनहद्दीतील समस्यांबाबत सारंगकर यांनी पञकारांकडुन समस्या जाणुन घेतल्या,यावेळी ते बोलत होते.शिरुर शहरातील वाहतुक समस्यांविषयी बोलताना ते म्हणाले कि, वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्राध्यान्य दिले जाणार असुन प्रशासन यंञणेतील प्रमुख यांबरोबरच सामाजिक, राजकिय, व्यापारी, विक्रेते, शाळा-महाविद्यालय प्रतिनीधींची एक समिती तयार केली जाणार असुन त्यानुसार नागरिकांकडुन मते जाणुन घेउन वाहतुक कोंडीची समस्या सोडविली जाईल. शिरुर शहरात फॅन्सी नंबरप्लेट,काळ्या काचा,बिना नंबरप्लेट यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

शहरातील चो-या व गैरप्रकार रोखण्यासाठी शहरात ठिकठिाणी सीसीटिव्ही यंञणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाणार असुन या माध्यमातुन ज्या ठिकाणी गैरप्रकार जास्त घडतात त्या भागात या यंञणेमार्फत वॉच ठेवला जाणार आहे.शिरुर चौफुला रस्त्यावर गस्त वाढवत असुन करडे घाटात लवकरच पोलीस चौकी उभारणार असुन त्याद्वारे करडे परिसरातील घडणा-या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत बोलताना शाळा व महाविद्यालय आवारात रोमिओगिरी,टगेगिरी करणारे यांच्यावर कडक कारवाई करणार असुन महिला व मुलींच्या बाबतीत कोणतेच गैरप्रकार खपवुन घेणार नसल्याचे सांगितले. शहरातील गुन्हेगारीबाबत बोलताना दोन किंवा जास्त गुन्हे असणा-यांवर तडीपारीच्या कारवाया करणार असुन गंभीर गुन्हे असणा-यांवर मोक्का लावला जाणार आहे. दारु, मटके तसेच अवैध धंदे करणा-यांवरही तडीपारीच्या कारावाया केल्या जातील. शिरुर शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना सर्वोच्च सुरक्षा व गुन्हेगारांवर जरब बसविण्याकडे लक्ष देणार असून, नागरिकांचेही याकामी सहकार्य मिळावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केले. शिरुरला शिस्तबद्ध यंञणा राबविण्याबरोबरच व शिरुर शहर भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिरुरचे नवनियु्क्त पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पञकार परिषदेत बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या