'अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार...आम्ही पाडणार'

No photo description available.
शिरूर, ता. 18 मार्च 2019 : राष्टवादीकडून शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला आहे. यामुळे पक्षातील गटबाजी जगजाहीर झाली आहे. सोशल मीडियावरही मोठ्याप्रमाणात नाराजीचे सुरू दिसत आहेत.

''अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार...आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार. लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली, पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार ...कोल्हेला पाडणार'' अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर झळकत असून, हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकारावरुन राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु झाली असून कोल्हे यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे असे दिसते. याचा फायदा विरोधी पक्षांना नक्कीच होऊ शकतो.

गेल्या निवडणुकीत विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिरुर मतदार संघात उभे होते. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना याबाबत साशंकता निर्माण झाली. राष्टवादीकडून शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे विलास लांडे यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे शिरुर मतदार संघात कोल्हेंविरोधात बॅनरबाजी करुन नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हेंना शिरुर मतदार संघात पाडणार अशी भुमिका लांडे यांचे कार्यकत्यांनी घेतली असून, त्यांना समजण्याचा प्रयत्न लांडे यांनी केला. त्यामुळे राष्टवादीच्या भोसरी, खेड मतदार संघावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, विलास लांडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. शरद पवार यांनी, कामाला लागा असा आदेश दिला असून लांडे यांनी देखील ''पक्ष जे काम देईल ते मी करणार'' अशी भुमिका स्पष्ट केली. यामुळे लांडे समर्थक मदत करणार की विरोध करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या