गद्दारी कधी केली नाही अन् करणारही नाहीः वळसे पाटील

Image may contain: 2 people, people smiling, closeup
शिरुर, ता. 18 मार्च 2019: शिरुर लोकसभा मतदारसंघात चर्चिल्या जाणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्या छुप्या युतीच्या चर्चेवर वळसे-पाटलांनी जाहीरपणे भाष्य केले. शरद पवारांनी आजवर अनेक पदे दिली, त्यामुळे त्यांच्याशी आणि पक्षाशी कधीच गद्दारी केली नाही, असे वळसे-पाटील म्हणाले.

विधानसभेत शिवाजीराव आढळराव पाटील हे वळसे-पाटील यांना मदत करतात आणि लोकसभेत वळसे-पाटील शिवाजी आढळराव यांना मदत करतात अशा चर्चा शिरुरमध्ये केल्या जातात. मात्र, अशी कोणतीही युती नाही, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

गेल्या निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेत आपले उमेदवार पडले. पण मी निवडून आलो. लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी 18 हजार मतांनी पिछाडीवर होती, पण विधानसभा निवडणुकीत मला 60 हजार मतांनी निवडून दिले. मतदारांचे माझ्यावरचे हे प्रेम असेल पण यामुळे माझ्यावर संशय घेतला जात आहे, की आढळराव लोकसभेत आणि वळसे-पाटील विधानसभेत असे आम्ही ठरवले आहे. पण हे स्पष्ट व्हायला हवे, असेही ते म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या