'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका बंद होणार नाही; पण...

Image may contain: 1 person, cloud, beard and sky
शिरूर, ता. 20 मार्च 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. पण, कोल्हे यांना मालिका सुरू ठेवायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या दराने पैसे भरावे लागतील. अन्यथा चित्रीकरणातून अमोल कोल्हे यांना काढावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची मालिका बंद केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. असे असले तरी जर कोल्हे यांना मालिका सुरू ठेवायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या दराने पैसे भरावे लागतील. अन्यथा चित्रीकरणातून अमोल कोल्हे यांना काढावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी आंबेगाव तालुक्‍यातून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मेलद्वारे करण्यात आली होती. भावनिक भूमिकेचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. मालिकेला विरोध नसून अमोल कोल्हे निवडणूक लढविणार असल्याने त्याचे प्रक्षेपण थांबवावे; तसेच अमोल कोल्हे यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी,' अशी तक्रार मेल मध्ये करण्यात आली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मालिका बंद केली जाणार नसल्याचे सांगितल्याने कोल्हेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या