शिरसगाव काटाच्या सुपुञाला विशेष सेवा पदक

Image may contain: 1 person, hat and closeup
शिरसगाव काटा,ता.२१ मार्च २०१९(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा येथील सुपुञ व गडचिरोली येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले सतीश जगताप यांना नुकतेच विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे.

शिरूर तालुक्यातील विविध पोलिस अधिकारी राज्यात महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पार पाडत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये नक्षलग्रस्त विभागात कठीण,खडतर व समाधानकारक कामगिरीबद्दल शासनाने राज्यभरातील पोलीस अधिका-यांची सेवा पदक यादी जाहिर केली आहे.

शिरसगाव काटा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सतीश जगताप हे गेल्या तीन वर्षांपासुन गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.त्यांना गडचिरोली येथील खडतर व कठीण कामगिरीबद्दल शासनाचे विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे.विशेष सेवा पदक जाहिर झाल्यानंतर शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे,घोडगंगेचे माजी संचालक नरेंद्र माने,माजी सभापती दादासो कोळपे,शिरसगाव चे सरपंच शोभा मोहन कदम,माजी सरपंच सतीश चव्हाण,उपसरपंच शिवाजी सोनटक्के,प्रकाश जाधव,माजी सरपंच संजय शिंदे,ग्रामपंचायत सदस्य पल्लवी जगताप,तंटामुक्ती अध्यक्ष सागर गराडे,सोसायटीचे चेअरमन अण्णासो कदम, जयकिसान सोसायटीचे चेअरमन विकास जगताप,राहुल कदम व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

याचबरोबर पिंपळे धुमाळ गावामधील सुपुत्र व महाराष्ट्र पोलिस दलात कळवा जिल्हा ठाणे येथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस (ACP) पदी कार्यरत असणारे रमेश मल्हारी धुमाळ, पुणे मार्केट यार्ड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन शहाजी धुमाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजित शिवाजी शिवरकर यांनाही विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या