पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांना विशेष सेवा पदक

Image may contain: 1 person, standing, sunglasses and outdoorशिरुर,ता.२१ मार्च २०१९(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांना विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये नक्षलग्रस्त विभागात कठीण,खडतर व समाधानकारक कामगिरीबद्दल शासनाने राज्यभरातील पोलीस अधिका-यांची सेवा पदक यादी जाहिर केली आहे.शिरुर पोलीस स्टेशनला सध्या कार्यरत असलेले भगवान पालवे यांनी गडचिरोली येथे १४ अॉगस्ट २०१४ ते अॉगस्ट २०१७ पर्यंत गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात खडतर तीन वर्षे सेवा केली आहे.त्यांच्या या सेवेची दखल घेत त्यांना विशेष सेवा पदक जाहिर करण्यात आले आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक म्हणुन उत्कृष्ट कामाचा ठसा उमटविणा-या पालवे अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे या गावचे रहिवासी असुन त्यांना हे सेवा पदक जाहिर झाल्याबदद्ल त्यांचे शिरुर शहर व परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या