शिरूर तालुक्यात दुष्काळाच्या तिव्र झळा

Image may contain: one or more people, people sitting, tree, outdoor and natureशिरुर,ता.२२ मार्च २०१९(प्रतिनीधी) : शिरूर तालुक्यात चारा व पाण्याची भिषण टंचार्इ निर्माण झाली असून तालुक्यात दुष्काळाच्या तिव्र झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत.

शिरूर तालुक्यात पावसाअभावी शेतक-यांना खरीप व रब्बी पिके घेता आली नाहीत.पावसाळयात एकही समाधानकारक पाउस झाला नाही तसेच अवकाळी पाउसही झाला नाही.त्यामुळे जमीनीतील पाण्याची पातळीही खालवल्याने विहीरींनी तळ गाठला असून शेतक-यांचे बोअरवेल तर बंदच पडले आहेत.

अवकाळी पाउस लागून विहीरी भरतील तसेच पाणी पातळी वाढून विंधन विहीरींना पाणी येर्इल व रब्बी पिक घेता येर्इल या  आशेवर शेतकरी होता.मात्र अद्याप असा एकही पाउस न झाल्याने त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.चासकमानचे आवर्तनही सर्वांना पुरेल असे सोडले जात नाही त्यामुळे येथेही बळीराजाची घोर निराशा होत असल्याने उभी पिकेही जळू लागली आहेत.खरीपा अभावी काळीभोर जमीन ओस पडली आहे,तर फळबागाही जळाल्या आहेत.माळरान उजाड पडले असून शेळया मेंढयांना देखील चरण्यासाठी चारा नाही.सर्वत्र ओसाड माळरान व सुकलेली झाडे दुष्काळाची दाहकता व भिषणता दर्शवित आहेत.दुष्काळसदॄश स्थितीमुळे चारा व पाण्याची टंचार्इनिर्माण झाल्याने शेतक-यावर पाळीव जनावरे विकण्याची परीस्थिती ओढवली आहे.

उन्हा तान्हात दूरवॄन भटकंती करून पाणी आणावे लागते किंवा पाणी विकत घेण्याशिवाय लोकांसमोर पार्याय उरलेला नाही.चासकमानच्या आवर्तनाचा पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी तसेच जनावरासाठी उपयोग होत असल्याने नियमीत आवर्तन सोडणे गरजेचे  आहे मात्र चासकमान धरणातील झपाटयाने कमी होत असालेली पाणी पातळी पाहता तिव्र पाणीटंचाइचा सामना करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या