डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्‍य हवे: अजित पवार

Image may contain: 1 person
शिरूर, ता. 22 मार्च 2019: कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हडपसर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्‍य हवे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून आघाडी टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काम केले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. यांनी गुरुवारी (ता. 21) पुण्यात उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुरुवारी (ता. 21) पुण्यात बोलताना पवार म्हणाले, ' शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना जात का आठवली नाही ? गेली २५ वर्षे युती सडली म्हणणारे, अफजल खानाची उपमा देणारे, आज पुन्हा एकत्र आले आहेत. आता त्यांना इतरांच्या जाती आठवत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हडपसर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्‍य हवे आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून आघाडी टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. पुणे लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणे गरजेचे होते, मात्र तो जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांनी इतर मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करावा. आपला मतदारसंघ सांभाळून दुसऱ्या मतदारसंघातील काम करावे.'

महिनाभर रात्री उशिराच घरी जा...
काही जण स्वतःचा मतदारसंघ सोडून थेट राज्य पातळीवरच प्रचाराला जातात. असे न करता स्वतःचा मतदारसंघ आणि आघाडीचा धर्म पाळा, एक महिनाभर रात्री उशिराच घरी जा, जे ‘सूर्यमुखी’ असतील त्यांनी सकाळी लवकर उठावे, दुपारच्या वेळी सहकाऱ्यांसोबतच जेवण करावे, महिनाभर वामकुक्षी सोडा, केवळ लग्न आणि साखरपुड्यांना हजेरी लावून प्रचार करू नका, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या