वाघाळे ग्रामपंचायतीवर महिलांचे वर्चस्व (Video)

Image may contain: one or more people, people standing and outdoorवाघाळे, ता.२२ मार्च २०१९(प्रतिनीधी) : वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शांताबाई दत्ताञय बढे तर उपसरपंचपदी लता संतोष गोरडे यांची निवड झाली.

सरपंच बबनराव शेळके व उपसरपंच शोभा कारकुड यांनी इतरांना संधी मिळावी यासाठी राजीनामा दिला होता.त्यामुळे त्या जागी निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली.सरपंचपदासाठी अमोल बाळासाहेब धरणे व शांताबाई दत्ताञय बढे हे दोन अर्ज आले होते.त्या वेळी घेण्यात आलेल्या मतदानात बढे यांच्याबाजुने जास्त मते पडली.त्यामुळे शांताबाई बढे यांना सरपंच म्हणुन घोषित करण्यात आले.तर उपसरपंचपदासाठी लता  संतोष गोरडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना उपसरपंच म्हणुन घोषित करण्यात आले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन टि.एस.गोसावी यांनी काम पाहिले.ग्रामसेविका एस. के. सोणवणे, तलाठी एस.एस.गायकवाड यांनी सहाय्य केले.रांजणगाव पोलीस स्टेशनचे नाना काळे, राजेंद्र वाघमोडे यांनी निवडणुक प्रक्रियेदरम्यान बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी नवनियुक्त पदाधिका-यांनी सर्व सदस्यांना विचारात घेउन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या