शिरूर लोकसभा: हायटेक प्रचारात आघाडीवर कोण?

Image may contain: 2 people, beard
शिरूर, ता. 25 मार्च 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल नेटवर्किंगचा मोठा वापर सुरू केला आहे.

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या यू-ट्यूब, व्हॉट्‌सअॅप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ, छायाचित्रे व्हायरल केली जात आहेत. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेमुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी सोशल मीडियासाठी खास यंत्रणा उभारली असून, हायटेक प्रचाराला सुरवात केली आहे. दोन कंपन्यांची सिमकार्ड असणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे. मतदारांकडे २५ लाखांहून अधिक मोबाईल असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय, सोशल नेटवर्किंगचाही वापर केला जात आहे.

दररोजच्या सभा, पदयात्रा, गाठीभेटींचे चित्रीकरण करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फूलस्क्रीन एलईडी व्हॅन असलेली टीम सोबत असते. संबंधित टीम छोटे-छोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहे, शिवाय, प्रचार सभांचे फेसबुकवरून Live करत आहे. सोशल मीडियावरून विविध भाषणे, छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यांना नेटिझन्सचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. मात्र, इंटरनेट युगामध्ये हायटेक प्रचारामध्ये आघाडीवर कोण आहे, असे आपणास वाटते, याबाबत जरूर व्यक्त व्हा....

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या