पत्रकार रविंद्र खुडे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Image may contain: 1 person, outdoorशिरूर, ता. 29 मार्च 2019: पत्रकार व प्रा. रविंद्र खुडे यांची पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पत्रकार संरक्षण समितीचे, संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व राज्य उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे (पाटील) यांनी पुणे जिल्हा कार्यकारीणीची नुकतीच निवड केली. उरुळीकांचन येथे झालेल्या या परीषदेसाठी, जिल्ह्यातून शेकडो पत्रकार उपस्थित होते. यात प्रा. रविंद्र पं. खुडे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), रामचंद्र चौधरी (पुणे जिल्हा सचिव), तुकाराम गोडसे (प्रसिद्धी प्रमुख) व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी, यावेळी सर्वानुमते करण्यात आल्या. ही निवड पुढील २ वर्षांसाठी असेल.

'या पत्रकार संरक्षण समितीचा मुख्य उद्देश म्हणजे, कोणाही पत्रकाराच्या मदतीला त्याचा संघ न पाहता संकटसमयी धावून जाणे हा असणार आहे. प्रत्येक पत्रकार हा आपलाच बंधू माणून त्याच्या पाठीशी भक्कमपणे ऊभे राहणे ही प्रथा आहे. ही प्रथा सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पुढेही चालू ठेवण्यासाठी खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू,' असे मत खुडे यांनी व्यक्त केले.

Image may contain: 10 people, people smiling, people standing and outdoor

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या