आढळराव-कोल्हे समर्थकांचे सोशल मीडियावर प्रचारयुद्ध

Image may contain: 2 people, people smiling, beard and text
शिरूर, ता. 2 एप्रिल 2019: शिरूर लोकसभा निवडणूकीचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू असून, यामध्ये नेटिझन्सनी सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झालेले पहायला मिळतात.

दोन्ही उमेदवारांचे नेटिझन्स समर्थक आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना बातम्या, छायाचित्रे, व्हिडिओ शेअर करतात. शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने घेतलेल्या मतचाचणी व बातम्यांवर प्रतिक्रिया नोंदवत असून, एकमेकांविरोधात कुरघोडीही करताना दिसतात. अर्थात, हे राजकीय प्रचाराचा एक भाग समजला जातो.

थोडक्यात, आढळराव-कोल्हे समर्थकांचे सोशल मीडियावर प्रचारयुद्ध पहायला मिळत असून, यामध्ये कोण आघाडीवर आहे, असे तुम्हाला वाटते?

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या