शिरुर मतदारसंघात 'या' प्रश्नांकडे नेत्यांचे दुर्लक्ष

Image may contain: 2 people, people smiling, beard and text
शिरुर, ता. ३ एप्रिल २०१९ (अभिजित आंबेकर) : शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सरळ लढत होत असुन एकास एक अशी लढत सध्या दिसत असली तरी काही अपक्ष या निवडणुकित उतरतील यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसानंतरच स्पष्ट होणार आहे. माञ या निवडणुकित ज्या शिरुर नावाने हा मतदारसंघ आहे. त्या शिरुर शहर व तालुक्यातील मुलभुत प्रश्नांकडे दोन्हीही पक्षांनी दुर्लक्ष केल्याने आजही शहर व तालुक्यातील दोन्ही प्रश्न प्रलंबित आहे.

शिरुर शहरात प्रामुख्याने वाहतुक कोंडी, वाहनतळ समस्या, पाणीपुरवठा समस्या, कचरा डेपोची मागणी, क्रिडांगण, व्यायामशाळा, नाट्यगृह-सिनेमागृह, जलतरण तलाव, टपरीधारकांचा पुनर्वसन प्रश्न, शिरुर शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्यामानाने नवीन कोल्हापुर पद्धतीचा बंधारा, अत्याधुनिक बस स्टॅंड, शौचालये या शिरुर शहरातील प्रामुख्याने भेडसावणा-या समस्या आहेत.शिरुर तालुक्यात चासकमान कालव्याचा पाणी प्रश्न,तळेगाव-न्हावरा-चौफुला रस्ता चौपदरीकरण, स्थानिकांना बेरोजगारीचा भेडसावणारा आदी समस्या या शिरुर तालुक्यात भेडसावत आहेत.

या संदर्भात शिरुर लोकसभा मतदार संघातील शिरुर तालुका हा महत्वाचा मतदारसंघ असल्याने हे विषय गांभिर्याने घेणे महत्वाचे आहेत.शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन वेळा शिरुर लोकसभा मतदार संघातुन व एकदा खेड मतदारसंघातुन सलग निवडुन आले आहेत.तर शिरुर लोकसभा मतदारसंघातुन भाजपचे बाबुराव पाचर्णे हे आमदार आहेत.सन २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अशोक पवार हे आमदार म्हणुन निवडुन आले होते.सन २०१४ पुर्वी देशात व राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी चे सरकार होते.त्यामुळे या समस्यांबाबत दोन्ही पक्ष जबाबदार आहेत.शिरुर शहराची लोकसंख्या काही वर्षांपुर्वी  २० ते २५ हजार होती माञ औद्योगिकिरणामुळे शहराच्या लोकसंख्येत दुपटी-तिप्पटीने वाढली आहेत.शहरालगत  नवीन मोठ-मोठी उपनगरे उदयास आली आहेत.माञ या लोकसंख्येबरोबर शहराच्या समस्या माञ जाग्यावरच राहिल्या आहेत. लोकसंख्येबरोबरच शहरातील समस्या सुटणे अपेक्षित होते.व जास्तीत जास्त सुविधा या नागरिकांना मिळणे गरजेचे असताना दोन्ही पक्षांकडुन माञ या समस्येकडे दुर्लक्षित करण्यात आले आहे.

शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणी प्रश्न शिरुर शहरालगत घोडनदी पाञातील कोल्हापुर पद्धतीचा बंधारा हा १९९६ बांधण्यात आला आहे. त्यावेळेस शहराची लोकसंख्या २० हजार होती.माञ २३ वर्षानंतर शहराची लोकसंख्या ६० हजारांच्या वर जाउन ठेपली आहे. तरीही त्याच बंधा-यातुन शहराला पाणीपुरवठा होत आहे.प्रत्यक्षात त्या बंधा-यात साठणारा पाणीसाठा अत्यल्प असल्याने तो एवढ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा पुरेल इतका शक्य नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने पाणी साठवणुकीकरीता एक नवीन बंधारा होणे आवश्यक होते,माञ या महत्वाच्या प्रश्नाकडे ना नगरपरिषदेने-ना खासदाराने- ना राष्ट्रवादी सरकारने लक्ष दिले. शिरुर शहरात प्रामुख्याने वाहतुक कोंडी,वाहनतळ समस्या,कचरा डेपोची मागणी, क्रिडांगण, व्यायामशाळा, नाट्यगृह-सिनेमागृह, जलतरण तलाव, टपरीधारकांचा पुनर्वसन प्रश्न हेही तितकेच महत्वाचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे होते. माञ या प्रश्नांकडे सुद्धा राज्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याने शिरुर शहर हे ओसाड बनले आहे. तर तालुक्यातील चासकमान कालव्याचा पाणी प्रश्न, शिरुर तालुक्यात पंचतारांकिंत औद्योगिक वसाहतीत स्थानिकांची बेरोजगारी, चौफुला-न्हावरा-चौफुला रस्ता चौपदरीकरण या महत्वाच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासुन जैसे-थेच असल्याचे चिञ दिसते. या प्रश्नांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने आजही या समस्या तालुक्यापुढे आ वासुन उभ्या आहेत. इतक्या वर्षांत या समस्या न सुटल्याने भविष्यात तरी या प्रश्नांकडे राजकिय नेते गांभिर्याने लक्ष देतील का निवडणुकिपुरतेच फक्त मतदारांचे प्रलोभन दाखवुन मनोरंजन करणार का याबाबत  मतदारांमध्ये संभ्रम कायम आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या