मंगलदास बांदल हे डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रचारात सक्रीय

Image may contain: 5 people, people smiling
शिरूर, ता. 5 एप्रिल 2019 : शिरूर लोकसभेसाठी उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी साथ सोडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, बांदल कौटुंबिक कारणामुळे बाहेर असल्याने प्रचारात सहभागी होऊ शकले नव्हते.

बांदल यांची राष्ट्रवादीच्या उपप्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून, ते प्रचारामध्ये सक्रीय आहेत. यामुळे बांदल यांनी कोल्हे यांची साथ सोडल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान बांदल यांनी केलेले भाषणाची चर्चा सर्वाधिक झाली. शिवाय, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झाला होता. डॉ. कोल्हे यांच्यापेक्षा बांदल यांचीच चर्चा सर्वाधिक झाली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून बांदल हे कोल्हे यांच्या प्रचारात दिसत नसल्यामुळे  सोशल मीडियासह नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या