...त्यांच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण

Image may contain: 1 personन्हावरे, ता.४ एप्रिल २०१९ (प्रतिनीधी) : ससून रुग्णालयातील परिचार्या व बी.जे महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांच्या प्रसंगावधाने युवतीचे प्राण वाचल्याची घटना घडली.

मुळच्या न्हावरे येथील असणा-या शर्मिला बापुसाहेब धुमाळ-साठे या सध्या पुणे येथील ससून रुग्णालयात परिचर्या म्हणुन व बी.जे. महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन नोकरीस आहेत. 

एनडीए खडकवासला जवळ एका अज्ञात मुलीने धरणात उडी मारून  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सभोवतालच्या लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले असता तिचे श्वसन क्रिया थांबली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यानच्या काळात तिथून जात असताना शर्मिला बापुसाहेब धुमाळ/साठे यांनी त्या मुलीला प्रसंगावधान राखत तातडीची जीवरक्षक प्रणाली अर्थात CPR देत श्वसनप्रक्रिया सुरळित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले व तिचे प्राण वाचविले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिला नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. श्रीमती धुमाळ यांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्या मुलीला जीवनदान दिले. श्रीमती शर्मिला धुमाळ यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या