टाकळी हाजीतील दरोडा प्रकरणी आरोपी गजाआड

Image may contain: 12 people, people standing, shoes and outdoorशिरुर,ता.६ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) : टाकळी हाजी (ता.शिरुर) येथील दरोड्यातील तीन आरोपींनी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत (दि.२) रोजी टाकळी हाजी नजीक टेमकरवस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी सुधाकर मनोहर काळे यांच्या घराच्या दरवाजावर दगडे  मारुन व कटावणीने दरवाजा उघडुन घरात प्रवेश करुन महिलांचे दागिने व रोख रक्कम असा मिळुन ६७,५०० रु.किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. तसेच काळे कुटुंबियांना मारहान करण्यात आली होती. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.

सदरच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत शिरुर पोलीस स्टेशन सह गुन्हे शाखेला समांतर तपास करणेबाबत पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मिना,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी आदेश दिले होते.त्यानुसार  गुन्हे शाखेचे प्रमुख  पद्माकर घनवट यांनी पथक तयार करुन गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना तपासादरम्यान सदर आरोपी अहमदपुर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीसांनी सापळा रचुन अहमदपुर येथुन तीन आरोपींना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींनी मंचर पोलीस स्टेशन हद्दीत वळती राजणी,पारगाव शिंगवे,मांदळवाडी तसेच पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत निघोज,टाकळी ढोकेश्वर,म्हसे,वडनेर,भाबुळवाडा येथे घरफोडी केल्याची माहिती पोलीसांना दिली आहे.या आरोपींनी जबरी चोरी, दरोड्याची तयारी करणे,घरफोडी,चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होणे बाकी असल्यामुळे पकडलेल्या आरोपींबाबत पोलीसांकडून गुप्तता ठेवण्यात आली असल्याचे घनवट यांनी सांगितले.

आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, सहायक फौजदार दत्ताञय गिरमकर, राजू मोमीन, पोपट गायकवाड, दयानंद लिमन, मोरेश्वर इनामदार, शब्बीर पठाण, विशाल साळुंके, धिरज जाधव, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांनी महत्वाची भुमिका बजावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या