डॉ. कोल्हे, आढळरावांना लोकसभेची निवडणूक अवघडच

Image may contain: 2 people, people smiling, beard and textशिरुर, ता. ९ एप्रिल २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर लोकसभेचे शिवसेनेचे भाजपा युतीचे उमेदवार व सलग तीन वेळा निवडून येणारे शिवाजीराव आढ़ळराव पाटील या निवडणूकीत चौकार मारण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल झाल्याने प्रचारात मागे पडल्याचे चिञ दिसत आहे.

शिरुर लोकसभेचे विद्यमान खासदार आढ़ळराव पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर झाल्यानंतर शिवसैनिकांकडून आनंद व्यक्त केला जात होता. माञ, या आनंदावर विरजन पडत त्यांच्या शिरुर तालुक्याच्या दौ-यात नागरिकांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता आढळराव पाटील यांना ही निवडणूक म्हणावी अशी सोपी नाही. तालुक्याच्या अनेक भागात आढ़ळराव यांच्याबरोबर तालुक्याचे भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे स्वत: फिरत आहेत. माञ, आढळराव यांना पुर्वीसारखा प्रतिसाद जनतेतून मिळताना दिसत नाही. त्यात त्याचा फायदा घेत सोशल मीडियावर त्यांना जास्त प्रमानात ट्रोल केल्यामुळे त्यांची पिछेहाट झाल्याचे चिञ सध्या राजकिय वातावरणावरुन दिसुन येत आहे.

शिरुर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार असलेले आढ़ळराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान शिरुर शहरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचार करण्यासाठी तयार असताना शिवसेनेच्या पदाधिका-यांकडुन त्याबाबत समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत काही भाजपच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दहा वर्षात शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार असलेल्या आढ़ळराव पाटील यांनी केलेली विकासकामे ही जनतेपर्यंत पोहोचविण्यात शिवसेनेचे पदाधिकारी कमी पडले असून पदाधिकारी हे संघटनेकडे लक्ष देण्यापेक्षा स्वःहिताकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहेत. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत याआधीच पोहोचवली असती तर शिवसेनेला या मतदारसंघात बॅकफुटवर जाण्याची वेळ आली नसती. सोशल मिडियात अत्यंत मागे असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमुळे आढ़ळराव पाटील यांना अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास सामोरे जावे लागत आहे.

आढ़ळराव पाटील यांना जर विजयाचा चौकार मारायचा असेल तर त्यांना प्रचंड मेहनत व पराकाष्टा करावी लागेल. यात शंकाच नाही.शिरुर लोकसभा मतदार संघाची निवडणुक जशी जवळ येउ लागली आहे, तशी निवडणुकित चुरस वाढु लागली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहिर झाली असून नुकताच शिरुर तालुक्याच्या काही भागात व शिरुर शहरात प्रचार दौ-याच्या निमित्त प्रचार फेरी काढण्यात आली होती. माञ, त्याला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण असून याचा परिणाम निवडणूकित होइल कि काय? अशी भिती राजकिय जाणकारांकडtन व्यक्त केली जात आहे. नुकतीच शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी प्रचार दौ-यानिमित्त तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, न्हावरे, करडे, गोलेगाव, तर्डोबाची वाडी आदी गावांसह शिरुर शहरात भेटी दिल्या. ग्रामीण भागात थोडाफार प्रतिसाद मिळाला असताना प्रत्येक गावात अमोल कोल्हे यांना फक्त पाहण्यासाठीच गर्दी झाल्याचे काही राजकिय जाणकारांनी सांगितले. प्रत्यक्षात या गर्दीचे मतात रुपांतर होइल कि नाही? हे आगामी काळच ठरवणार आहे.

सायंकाळी ग्रामीण भागातील प्रचार दौरा आटोपल्यानंतर शिरुर शहरात डॉ.अमोल कोल्हे यांच उशिरा आगमन झाल्यानंतर शहरात प्रचार फेरी काढण्यात आली माञ या प्रचारफेरीला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. शिरुर शहरातील महत्त्वाची समजली जाणारी बाजारपेठ हि अमोल कोल्हे यांना उशिर झाल्याने बंद झाली होती, त्यामुळे या प्रचारफेरीला शहरातही नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अमोल कोल्हे यांना प्रचारफेरी आवरती घ्यावी लागली. राष्ट्रवादी  पदाधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या प्रचारफेरीला उशिर झाल्याचे अनेक नागरिकांनी मत व्यक्त केली. शहरात झालेली गर्दी पाहता फक्त अभिनेते अमोल कोल्हे यांना पाहण्यासाठीच गर्दी करत होते. माञ, उशिरा शहरात आल्याने पाहणा-या नागरिकांचा भ्रमनिरास झाला. प्रत्यक्षात शहरात प्रथम प्रचारफेरीचे नियोजन करणे गरजेचे असताना राष्ट्रवादीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे शहरातल्या उपनगरात प्रचारफेरी काढल्याने शहरात ही प्रचारफेरी यायला उशिर झाला.या सर्व गोष्टीला जबाबदार कोण याबाबत उलटसुलट चर्चा शहरात चालु होती.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या संपुर्ण प्रचारदौ-यात त्यांच्या समवेत तालुक्याचे माजी आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे त्यांच्या समवेत दिसून येत होते. विधानसभेसाठी पवार व कंद हे दोन्ही ही इच्छुक असल्याने दोघेही आपआपल्या परिने ही प्रचारयंञणा राबवताना दिसत होते. माञ, या निवडणुकिचा फायदा उठवित दोघांनीही स्वत:चा प्रचार करुन घेतला असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु होती. त्यामुळे अमोल कोल्हे यांना या दौ-यामुळे किती फायदा होतो हे माञ आगामी काळातच दिसुन येइल हे तितकेच खरे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या