जनतेचा भ्रमनिरास होऊ देणार नाही: डॉ. अमोल कोल्हे

Image may contain: 1 person, smiling, beard and eyeglasses
शिरूर, ता. 9 एप्रिल 2019 : "लोकप्रतिनिधीच्या पंधरा वर्षाच्या कारभाराला व भूलथापांना जनता कंटाळली आहे. ही निवडणूक कष्टकरी जनतेने हातात घेतली आहे. जनतेचा भ्रमनिरास मी होऊ देणार नाही. मतदारसंघातील प्रश्‍न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.' असे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

डॉ. कोल्हे यांच्या प्रचार दौऱ्याचे जुन्नर तालुक्‍यात आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत बैलगाडा, घोडा, उंट यांच्या ताफ्यासह गाडामालक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाक्‍यांच्या आतषबाजीने डॉ. कोल्हे यांचे धूमधडाक्‍यात स्वागत करण्यात आले. त्यांचे औक्षण करण्यासाठी प्रचारमार्गावर ज्येष्ठ महिलांनी गर्दी केली होती. "आमचा शिवबा विजयी होणार,' असा आशीर्वाद या वेळी ज्येष्ठ महिलांनी त्यांना दिला. सेल्फी काढण्यासाठी तरुण, तरुणी त्यांना आग्रह करत होते. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला.

दरम्यान, प्रचाराच्या दुसऱ्या फेरीत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने डॉ. कोल्हे यांची ताकद वाढली आहे.

Image may contain: 10 people, crowd

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या