बाबूराव पाचंगे यांनी केला डॉ. कोल्हे यांच्यावर 'हा' आरोप

शिरूर, ता. 9 एप्रिल 2019: वढू बुद्रुकला संभाजीराजांच्या बलिदानदिनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली. शंभुराजांवर प्रेम म्हणून नव्हे, तर मतांवर डोळा ठेवून ते आले होते. गतवर्षी त्यांना निमंत्रित करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ गेले असता त्यांनी चार लाख रुपये मानधनाची मागणी केली. दोन लाखांवर तडजोड झाल्यानंतर ते आले होते, असा आरोप भाजप व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाचंगे यांनी केला आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com ने मतचाचणी घेतली असून, नेटिझन्स काय म्हणतात ते पहा...

शिरूर मतदारसंघातून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौकार मारणारच आहेत. इतकेच नव्हे; तर भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना व शिवसंग्राम संघटनेच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांत मजबूत समन्वय झाल्याने पुणे जिल्ह्यातही महायुती चौकार मारणार आहे, असा विश्‍वास आमदार बाबूराव पाचर्णे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सोमवारी (ता. 8) ते बोलत होते.

"राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे नेता नव्हे, तर अभिनेता म्हणूनच शोभतात. ते अभिनेता म्हणून टीव्हीवर शोभतील; शिवाजीराव आढळराव नेता म्हणून शिरूर मतदारसंघातून गाजतील,'' असा विश्‍वास पाचर्णे यांनी व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या