शिरुर तालुक्यातील 'या' गावांमध्ये २३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Image may contain: one or more people and outdoorशिरुर, ता.११ एप्रिल २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवत असुन शिरुर तालुक्यातील ७ गावे व ७६ वाड्यावस्त्यांवर २३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी दिली. दरम्यान घोडधरणात शुन्य टक्के पाणी साठा शिल्लक शिल्लक राहिला असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असुन तापमानात मोठी वाढ होत आहे. शिरुर तालुक्याच्या काही भागात दोन महिन्यांपुर्वीच टॅंकरची मागणी आल्याने प्रशासनाने दखल घेत त्वरीत पश्चिम पट्ट्यात १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता.परंतु दुष्काळाची वाढती दाहकता लक्षात घेता व नागरिकांच्या मागणीची दखल घेउन यात वाढ करण्यात आली आहे.शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील मिडगुलवाडी, केंदुर, पाबळ, कान्हुर मेसाई, खैरेवाडी, पाबळ, धामारी, खैरेनगर या गावांसह ७६ वाड्या-वस्त्यांवर २३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हिवरे गावठाण चा टॅंकरसाठी प्रस्ताव आला असल्याचे गटविकास अधिकारी जठार यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याबरोबच जनावरांच्या पाण्याचीही समस्या मोठी असुन पशुपालकांनी टॅंकरच्या होणा-या खेपांमध्ये जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचाही विचार करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान शिरुर व श्रीगोंदा  तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड धरणात सध्या शुन्य टक्के पाणीसाठा शिल्लक असुन १९०० घनफुट इतका मृतसाठा धरणात शिल्लक असल्याचे घोड धरणाचे कनिष्ठ शाखा अभियंता रावसाहेब तळपे यांनी दिला आहे.

घोडधरणावर अवलंबुन असलेल्या शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव या गावांना धरणात पाणीच नसल्याने व पुढील आवर्तन येइपर्यंत व आवर्तन न आल्यास भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे पुर्व भागातील नागरिकांनी बोलताना सांगितले. दरम्यान कुकडी प्रकल्पातुन डिंभे धरणातुन घोडनदीपाञात पाणी सोडल्याने बेट भागात काठापुर, पिंपरखेड, कवठे येमाई, फाकटे, आमदाबाद, टाकळी हाजी या घोडनदी काठांवरील गावांना पाणी मिळाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या