शिरूर लोकसभा मतदारसंघातून एक अर्ज झाला बाद

Image may contain: one or more people
पुणे, ता. 11 एप्रिल 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघातून 27 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी (ता. 10) झालेल्या छाननीत एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांच्यासह 27 इच्छुक उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी प्रज्ञा अरुण कांबळे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) यांनी नामनिर्देशनपत्रामध्ये दहा सूचकांची स्वाक्षरी, अंगठ्याचे ठसे आणि इतर माहिती दिली होती. मात्र, दोन सूचकांच्या अंगठ्यांचे ठसे अस्पष्ट असल्याचे निदर्शनास आले. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवाराला कळवून त्रुटी दूर करण्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली. मात्र, छाननी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार हजर राहिला नाही. त्यामुळे तो अर्ज बाद ठरविल्याची माहिती निवडणूक अधिकारी रमेश काळे यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतरच शिरूरमधून किती उमेदवार रिंगणात असतील, हे चित्र स्पष्ट होणार आहे. 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या