आढळराव पाटील व डॉ. अमोल कोल्हे यांच्याविषयी...

Image may contain: 2 people, people smiling, beard and text
शिरूर, ता. 11 एप्रिल 2019 : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे राहील, याविषयी थोडक्यात...

शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
वय : 62
शिक्षण : इंटरमेडियट (आर्टस)

- विद्यमान खासदार म्हणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात यश
- मागील 15 वर्षांपासून मतदारसंघात संपर्क
- जुन्नर, खेड, शिरूर व हडपसर या चार मतदारसंघांत भाजप-सेनेचे आमदार
- हडपसर मतदारसंघातही शिवसेनेची मोठी ताकद
- सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांत भाजप-सेनेचे प्राबल्य

विरोधातील मुद्दे
- सलग चौथ्यावेळी निवडणूक रिंगणात असल्याने प्रस्थापित उमेदवार म्हणून विरोधी कौल (अँटी इन्कंबन्सी फॅक्‍टर) जाण्याचा धोका
- खेड तालुक्‍यातील विमानतळ पुरंदरला गेल्याच्या नाराजीचा फटका
- बैलगाडा शर्यत, पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-नाशिक रेल्वेचे काम पूर्ण करण्यात अपयशडॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस)
वय : 38
शिक्षण : एमबीबीएस

- "स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून मतदारसंघातील घरा-घरांत पोहोचले
- पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे शिवसेनेतील मित्रपरिवाराकडून छुपी मदत मिळण्याची शक्‍यता
- मनसेचा जाहीर पाठिंबा
- जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य.
- तरुण व नवा चेहरा

- राजकारणात नवखे असल्याने, मतदारसंघात संपर्क तुलनेने कमी
- कलाकार की राजकारणी असा संभ्रम
- मतदारसंघातील प्रश्‍न, समस्यांची कमी जाण

पक्षाला शिरूर मतदारसंघात मिळालेले यश (1952 पासून)
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस --- 12
- शिवसेना व भाजप --- 03मतदारसंघातील पक्षीय बलाबल
महायुती
विद्यमान खासदार (स्वत: उमेदवार), शिवसेनेचे दोन व भाजपचे दोन असे चार आमदार, तीन पंचायत समित्यांचे सभापती, एक नगरपालिका आणि बारा जिल्हा परिषद सदस्य

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी
एक आमदार, एक पंचायत समिती, एक नगरपालिका आणि सोळा जिल्हा परिषद सदस्य.

2014 च्या निवडणुकीत मिळालेली मते
  • शिवसेना --- 6 लाख 43 हजार 415
  • राष्ट्रवादी काँग्रेस --- 3 लाख 41 हजार 601

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या