आपण त्यांना का निवडूण द्यावे? सांगा ठोस कारण...

Image may contain: 2 people, people smiling, beard and text
शिरूर, ता. 14 एप्रिल 2019: शिरूर लोकसभेचा प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. उमेदवारांप्रमाणेच नेटिझन्सही प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात. आपला खासदार कसा असावा? आपण त्यांना का निवडूण द्यावे? याबाबत जरूर व्यक्त व्हा...

शिरूर लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे प्रबळ दावेदार आहेत. दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. संबंधित बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचे चाहतेही प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया या उमेदवारांप्रमाणेच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.

एका उमेदवाराची बातमी अपडोड झाली की 'पेड बातमी' म्हणून दुसऱया उमेदवाराचे समर्थक प्रतिक्रिया व्यक्त करतात. हजारो प्रतिक्रिया व मतचाचणीवरून संकेतस्थळाची व्यापकता दिसून येते. लोकशाही व सोशल मीडियाच्या काळात, हे व्हायलाच हवे. मतदार व नेटिझन्सनी स्पष्ट मत मांडून जरूर व्यक्त व्हायला हवे. मतदानाचे आपण आपले कर्तव्य बजावत असताना, आपल्याला खासदार निवडण्याचा हक्क आहे.

आपला खासदार कसा असावा? आपण त्यांना का निवडूण द्यावे? याबाबत ठोस कारणासह आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियांवरूनच पुढील बातम्या करण्याचा निर्णय संकेतस्थळाने घेतला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या