शिरुरला प्रचारयंञणा थंड माञ पैंजा जोरात...

No photo description available.शिरुर, ता.१८ एप्रिल २०१९ (प्रतिनीधी) : राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचा हाय जोश असताना शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिरुर शहर व तालुका परिसरात माञ प्रचार थंड व संथगतीने सुरु असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. माञ प्रचार जरी थंड असला तरी शिरुर लोकसभा व नगर लोकसभा मतदारसंघासाठी दोन्ही बाजूने विजयाच्या दावा करत मोठ-मोठ्या पैंजा लावल्या जात आहे.

शिरुर शहरातील उपनगरात पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक वास्तव्यास आहेत.या नागरिकांचे मतदान जरी शिरुर लोकसभा मतदार संघात असले तरी त्यांचे मुळगाव हे नगर जिल्हयात येत असल्याने तेथे त्या ठिकाणी असलेली शेती, घर त्यामुळे त्यांची नाळ नगरजिल्ह्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे शिरुर शहरात आजच्या घडीला चहाची हॉटेलं, गार्डन, चौका-चौकात, नगररदक्षिण लोकसभा मतदार संघ व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मोठ-मोठ्या पैंजा लावताना ज्या-त्या पक्षाचे समर्थक दिसत आहे. जशी शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढ़ळराव पाटील व राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. तशीच नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. या निवडणुकिची तत्परता लक्षात घेता आढ़ळराव पाटील यांचे समर्थक व कोल्हे यांचे समर्थक तसेच विखे पाटील यांचे व संग्राम जगताप यांचे समर्थक हे आपला उमेदवार कसा निवडुन येइल हे गणिते मांडताना दिसत आहे.त्यामध्ये खडाखडी होउन त्याचे रुपांतर मोठ-मोठ्या पैंजात होत आहे.

दोन्ही मतदारसंघाची निवडणुक ही अत्यंत चुरशीची बनल्याने शहरात चर्चेला उधान आले आहे.चारही उमेदवारांचे समर्थक माञ आपआपसात भिडताना दिसत आहेत.त्यामुळे निवडणुकितील चुरस समर्थकांमध्ये वाढलेली दिसत आहे,माञ प्रचारकामी शहरात शुकशुकाट जाणवत असुन शिवसेनेचे शिवाजीराव आढ़ळराव पाटील व राष्ट्रवादीचे अमोल  कोल्हे यांनी शहरात एक प्रचारफेरी पुर्ण केली आहे.तसेच शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी शहरात पञके घेउन शहरातील काही भागात फिरताना दिसत आहे.

माञ प्रचारात म्हणावा तसा जोर कुठेच दिसुन येत नसुन कुठल्याही मोठ्या राजकिय नेत्याची सभा शिरुर शहर व परिसरात कुठेही झालेली नाही. मोठ-मोठी भोंगे असलेली वाहने, प्रचाररथ, रिक्षा अशी प्रचारयंञणेतील वाहने कुठेच दिसुन येत नसुन निवडणुकिचे वातावरण शहर व परिसरात कुठेही अनुभवयास मिळत नाही. ढाबे, हॉटेल्स वरही शुकशुकाट दिसुन येत असुन निवडणुकिचे वारे थंडच असल्याचे दिसुन येते. शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडुन डॉ. अमोल  कोल्हे हे निवडणुकिच्या रिंगणात असुन शिवसेनेकडुन विद्यमान खासदार शिवाजीराव आढ़ळराव पाटील निवडणुक लढवित आहे. या दोन्ही पक्षांच्या शिरुर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ आलेली दिसत असुन कुठलाही उत्साह यांच्या चेह-यावर जाणवत नसुन केवळ दिखाव्यासाठी पक्षाचे काम करत असल्याचे चिञ सध्या दिसत आहे. फेसबुक, सोशल मिडिया यांच्यावर झळकण्यापुरतंच या कार्यकर्त्यांचं अस्तित्व असुन पक्षाचं काय देणं-घेणं नसल्याच्या अविर्भावात हे कार्यकर्ते दिसुन येत आहेत.

गावोगावी देखिल निवडणुकिच्या केवळ पारावर गप्पा होताना दिसत असुन मतदारराजा माञ शेतीकामात व्यस्त असल्याचे चिञ असुन सोशल मिडियावर असणारा हाय जोश प्रत्यक्षात माञ दिसुन येत नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडणुकिची झिंग अद्याप फारशी चढलेली दिसुन येत नसुन ज्या त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभे नंतरच ख-या अर्थाने निवडणुक रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या