'ते' दृश्य पाहून वर्दीसह अनेकांना फुटला पाझर... (Video)

No photo description available.शिरुर, ता. २१ एप्रिल २०१९ (सतीश केदारी)  : शिरुर जवळ पहाटे झालेल्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांसह आई अन २० दिवसांच्या नवजात बालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातात आश्चर्यकारक बचावलेली चार वर्षांची मुलगी अन घटनास्थळावरील दृश्य खाकी वर्दीसह अनेकांच्या काळजाला पाझर फोडणारे होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,औरंगाबाद येथे किशोर हाके याला मुलगा  झाला होता.बायकोला व मुलाला पुन्हा सध्या राहत असलेल्या ठिकाणी वाघोली येथे घेउन येण्यासाठी किशोर, शुभम, त्यांची आई विमलबाई,लहान भाची हे औरंगाबाद ला गेले होते. औरंगाबाद येथुन राञी कारने किशोर ची पत्नी वव नवजात बाळ यांना घेउन कुटुंबिय पुन्हा वाघोली कडे येत होते. दरम्यान शिरुर जवळच काळाने त्यांच्यावर झडप घातली.पुणे-अहमदनगर बाह्यमार्गावर पाचर्णे मळा येथे शिरुर नजीक (दि.२१) रोजी पहाटे चारच्या सुमारास रस्त्यावर बंद पडलेल्या मालवाहु कंटेनर(आर.जे.०५ जी.बी.२४३३) ला वॅगनर कार (एम.एच.१२ क्यु. डब्ल्यु ८५०२) पाठीमागुन धडकली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यासह पोलीस कर्मचारी जनार्दन शेळके, रविंद्र पाटमास,कृष्णा व्यवहारे,संजय जाधव,उमेश भगत, करणसिंग जारवाल, हेमंत शिंदे, अभिषेक ओहोळ, सुरेश नागलोथ, गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेउन स्थानिक नागरिकांसह जखमींना व मृतांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.


Image may contain: 3 people, closeup and text
या झालेल्या अपघातात किशोर माधव हके (वय.३२), लिंबाजी उर्फ शुभम माधव हके (वय.२५), विमलबाई माधव हके (वय.६०) तसेच २० दिवसाचे नवजात बालक (सर्व सध्या रा.रायसोनि कॉलेज पाठीमागे, वाघोली, पुणे, मुळ रा. रामतिर्थ ता.लोहा, जि.नांदेड) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला. पुष्पा किशोर हके(वय.२५) या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळावर अपघात झाल्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघाताची खबर रमेश चौधरी यांनी दिली.

कंटेनर व कार मध्ये झालेल्या अपघाताची तिव्रता इतकी होती कि कारचा चक्काचुर झाला. माञ, कार मध्ये असलेली समृद्धी बजरंग हलगुडे हि चार वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाउ किशोर व शुभम, त्याची आई विमलबाई, तर अवघ्या २० दिवसांपुर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचा समावेश आहे.

अपघातात वाचलेल्या समृद्धी हिला किरकोळ जखम वगळता फारसे लागले नाही.अपघात झाल्यानंतर कार मध्ये अडकलेल्या समृद्धीला बाहेर काढल्यानंतर नातेवाईक येइपर्यंत शिरुर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात शिरुर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी पोलीस नाईक उषा अनारसे, विद्या बनकर, मोनिका  जाधव,रेश्मा गाडगे,शितल गवळी यांनी त्या मुलीचा सांभाळ केला. यावेळी मयत २० दिवसांचे बाळ, वाचलेली चार वर्षांची मुलगी अन एकाच कुटुंबातील मयत चार व्यक्ती हे दृश्य पाहून अनेकांना भावना आवरता येत नव्हत्या. त्यामुळेच या घटनेत देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या