चासकमानचे आवर्तन आजपासून सुटणार...

Image may contain: sky, mountain, bridge, outdoor, nature and waterकेंदूर, ता.२२  एप्रिल २०१९ (विशाल वर्पे) : करंदी (ता. शिरूर) परिसरातून चासकमानच्या पाण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून आग्रही मागणी होत असताना अखेर पिण्याच्या पाण्यासाठी सोमवारी चासकमानच्या कालव्यातून पाणी सोडणार असल्याची माहिती नुकतीच चासकमानचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर यांच्याशी झालेल्या बैठकीत अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे परीसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, किमान आठ ते दहा दिवस पुरणारे हे पाणी शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार असल्याने परिसरात शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, हे पाणी सोडत असताना शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांनी केले आहे हे पाणी फक्त पिण्याच्यासाठी असून शेतकऱ्यांनी कोणत्याही चारीला पाणी सोडण्याची मागणी करू नये.

परिसरातील विहिरींना तळ गाठला असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पिण्याच्या पाण्याची समस्या समोर उभी राहिली होती. जनावरांना ओला चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने दुध व्यावसायिक देखील अडचणीत सापडले होते. शंभर टक्के धरण भरून देखील नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे, अशा आशयाचे वृत्त प्रसारित केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर चासकमानच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी नवल किशोर यांच्याशी झालेल्या बैठकीत सोमवारी पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तुर्तास उपलब्ध साठा हा आठ ते दहा दिवस पुरणार आहे. कालव्यातून जाणाऱ्या पाण्याची थोड्याफार प्रमाणात गळती होऊन नजीकच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना याचा फायदा होणार आहे, त्यामुळे काही प्रमाणात करपून जाणारी पीक सध्यातरी सावरू शकतात अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या