शिरुरला तृतीयपंथीय प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

Image may contain: 3 people, people smilingशिरुर,ता.२६ एप्रिल २०१९(प्रतिनिधी) : शिरुर लोकसभेसाठी शिरुर-हवेली विधानसभा क्षेञात एकुण ३८८ मतदान केंद्र असल्याची माहिती निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार दिलीप जाधव यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना देताना त्यांनी सांगितले कि, शिरुर लोकसभेसाठी शिरुर हवेली विधानसभा क्षेञात एकुण ३ लाख ६९ हजार ८७२ इतकी मतदार संख्या असुन त्यापैंकी १ लाख ९३ हजार ७६ इतके पुरुष व १ लाख ७६ हजार ७९१ इतके महिला मतदार आहेत.तर पाच तृतीयपंथीय मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी एकुण ३८८ मतदान केंद्रे प्रशासनाने आरक्षित केली आहेत. निवडणुक कामी ३० झोनल  अॉफिसर, फिरती पथके २३ नियुक्त केली आहेत. मतदान केंद्रावर मतपेट्या नेण्यासाठी ६६ एसटी बस, १२ मिनीबस, ८ जीप अशी वाहन व्यवस्था केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या