शिरूर मतदारसंघातील वॉरंट जारी झालेला उमेदवार कोण?

Image may contain: 1 person, smiling
शिरूर, ता. 26 एप्रिल 2019: शिरूर मतदार संघातील एका उमेदवारावर दिघी पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल असून, न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तो उमेदवार कोण? अशी चर्चा मतदार संघामध्ये रंगली आहे.

शिरूर मतदारसंघातील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शनिवारी (ता. 20) अटक वॉरंट जारी केले आहे. या उमेदवाराला 16 मे 2019 पूर्वी अटक करून न्यायालयासमोर हजर करावे, असे म्हटले आहे. या उमेदवाराविरोधात दिघी पोलिस चौकीमध्ये 2016 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय, या उमेदवाराने दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपले निवडणूक कार्यालय थाटले आहे.

प्रचाराच्या धामधूमीत अटक वॉरंट जारी झाल्याने प्रचार करायचा तरी कसा, असा प्रश्न त्या उमेदवारासमोर निर्माण झाला आहे. पोटगीबाबत हे वॉरंट निघाले आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले.

दरम्यान, शिरूर मतदारसंघामध्ये त्या उमेदवाराबाबत चर्चा रंगली असून, दबक्या आवाजामध्ये उमेदवाराचे नावही पुढे येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या