प्रेमासाठी पळून आली अन् जीवाला मुकली...

Image may contain: 1 person, smiling, closeup
कोरेगाव भीमा, ता. 27 एप्रिल 2019 : प्रेमासाठी प्रियकरासोबत पळून येथे आलेल्या प्रियेसीचा पतीनेच खून केल्याची घटना घडली आहे. प्रियेसीचा खून करून पळून गेलेल्या प्रियकराला शिक्रापूर पोलिसांनी ओडिशा येथून अटक केली आहे. या खूनप्रकरणातील आरोपी खिरसिंधू सुरेंद्र प्रधान (रा. देसशरी, ता. चिकीटगड, ओडिशा) यास शिक्रापूर पोलिसांनी अटक केले असून, त्यास 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव भीमा येथे वढू बुद्रुक रस्त्यावर रवींद्र झांबरे यांच्या इमारतीत 14 मार्च 2019 पासून सिंधू जॉन्सन (रा. ओडिशा) व प्रियांका पीतांबर प्रधान (वय 21) अशी नावे सांगणारे जोडपे राहण्यास आले होते. दरम्यान, 19 एप्रिलला राहत्या घरी प्रियांकाचा मृतदेह आढळून आला होता. तपासात तिचा खून पती सिंधू यानेच केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष होता; परंतु सिंधू जॉन्सन हा तिचा पती नसून प्रेम प्रकरणातून ते दोघेही ओडिशा येथून पळून आल्यानंतर कोरेगाव भीमा येथे नाव बदलून राहत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.

आरोपीचे मूळ नाव खिरसिंधू सुरेंद्र प्रधान (रा. देसशरी, ता. चिकीटगड, ओडिशा) असे असून त्याला शिक्रापूर पोलिसांनी ओडिशा येथून अटक केली आहे. खून झालेली प्रियांका प्रधान हिचे 25 जानेवारीला प्रशांतकुमार भास्कर शिरा (रा. मधेपुरा, आंध्र प्रदेश) याच्याशी लग्न झाले होते. ती 6 मार्च रोजी बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी आजोबा बिपिन प्रधान (रा. देसारी, ओडिशा) यांच्याकडे आली होती. मात्र 11 मार्च रोजी ती परीक्षेला गेली ती पुन्हा परतलीच नाही. या दरम्यान, प्रियांका प्रधान ही प्रियकर खिरसिंधू प्रधान याच्यासमवेत पळून येऊन कोरेगाव भीमा येथे खोली घेऊन राहत होती. त्या वेळी प्रियांका गरोदर असल्याने "आपण घरी जाऊ आणि आईला घेऊन येऊ, असे संशयित खिरसिंधू प्रधान प्रियांकाला म्हणाला होता. मात्र, त्यावर चिडून प्रियांकाने आरोपीच्या आई बहिणीबाबत अपशब्द वापरल्याचा राग येऊन खिरसिंधूने गळा दाबून प्रियांकाचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने पळ काढला होता. पोलिस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर व नागरगोजे यांनी संशयितास ओडिशा येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

एटीएम कार्डवरुण मिळवला महिलेचा पत्ता
खून झालेल्या महिलेचा व तिच्या नवऱयाचा कोणताही ओळखीचा पुरावा नसताना शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शिवशांत खोसे यानी मृत महिलेच्या एटीएम कार्ड वरून एसबीआय बँकेतून महिलेचा आधार कार्ड मिळवून त्यावरील पत्यावरून महिलेच्या घरच्यांशी संपर्क करून शोध घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या