...म्हणून राष्ट्रवादीत आलोः डॉ. अमोल कोल्हे

Image may contain: 1 person, smiling, beard and eyeglassesशिरूर, ता. 28 एप्रिल 2019: शिवसेनेने मला साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढाल का? असे विचारले होते. त्यावेळी मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नाही, असे सांगून शिवसेनेला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले, असे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या प्रचाराची शनिवारी सांगता केली. यावेळी राजगुरूनगर येथे बोलताना कोल्हे म्हणाले की, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे नेते होते. काही अमोल कोल्हे यांना शिवसेनेने उदयनराजेंविरोधात निवडणूक लढण्यास सांगितले होते. परंतु कोल्हे यांनी त्यास विरोध करत शिवसेनेला रामराम केला. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यामागचा शनिवारी (ता. 27) गौप्यस्फोट केला.

आज शिवसेनेवाले मला अभिनेता लोकनेता कसा होणार? म्हणून हिणवत आहेत. त्यांनीच मला सातारा येथून लढण्याविषयी विचारले होते. तुमच्या आशीर्वादाने लोकसभेत गेल्यावर तेथे तरुणांचा, शेतकऱयांचा. महिलांचा, बैलगाडामालकांचा, मावळ्यांचा आवाज घुमेल. या भूमीला अभिमान वाटेल असे काम करून दाखवीन, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या