शिरुर-हवेलीतील ३८८ मतदान केंद्रांवर २५६२ कर्मचारी

शिरुर,ता.२९ एप्रिल २०१९(प्रतिनीधी) : शिरुर लोकसभा सार्वञिक निवडणुकिसाठी शिरुर मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने सोमवार(दि.२९) रोजी  होणा-या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली असुन रविवारी(दि.२८) रोजी शिरुर-हवेलीती विधानससभा क्षेञातील ३८८ मतदान केंद्रांवर २५६२ कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती शिरुरचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी दिली.

शिरुर लोकसभेची सार्वञिक निवडणुक पार पडत असुन शिरुर च्या कुकडी हॉल येथे निवडणुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.याच ठिकाणी गावनिहाय मतदान केंद्रांवर मतपेट्या व मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचारी, नेमणुक केलेले महिला व पुरुष कर्मचारी यांनी रविवारी सकाळपासुनच गर्दी केली होती.बाहेरच्या तालुक्यातुन शिरुर तालुक्यात निवडणुककामासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची यावेळी गोंधळ उडत होता.माञ प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शक कक्ष उभारुन सुचना करण्यात येत होत्या.
सकाळपासुनच शासकिय कर्मचारी यांना साहित्य वाटप,त्यांचे नेमणुकीचे ठिकाण याची जुळवाजुळव प्रत्येकजण करण्यात व्यस्त होते.काहीजण सर्व साहित्य व्यवस्थित आहे हे तपासुन पाहत होते.कुकडी हॉल जवळ मतदान केंद्रे,नेमणुक ठिकाण तसेच नेमलेले अधिकारी यांची व्यवस्था याबाबत वेगवेगळे टेबल व फ्लेक्स लावले असल्याने प्रत्येकाला आपले नेमणुक ठिकाण,वाहन व्यवस्था शोधणे सोपे जात होते.यासाठी रामचंद्र जगताप व नेमलेले अधिकारी आवश्यक मार्गदर्शन विशेष कक्षातुन करत होते.
कुकडी हॉल याठिकाणी शिरुर चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सचिन बारी, तहसिलदार गुरु बिराजदार सकाळपासुनच लक्ष ठेवुन होते.शिरुरचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी या विषयी अधिक माहिती देताना सांगितले कि,निवडणुककामी ३० झोनल  अॉफिसर,फिरती पथके २३ नियुक्त केली असुन मतदान केंद्रावर मतपेट्या नेण्यासाठी ६६ एसटी बस, १२ मिनीबस, ८ जीप अशी वाहन व्यवस्था केलेली आहे.शिरुर लोकसभेसाठी शिरुर-हवेली विधानसभा क्षेञात एकुण ३८८ मतदान केंद्र असुन त्यासाठी ४२७ पथके तयार करण्यात आली असुन प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी,एक शिपाई,एक पोलीस कर्मचारी असे एकुण २५६२ कर्मचारी नेमले असल्याचे त्यांनी सांगितले. ३० झोनल अॉफिसर नेमलेल्या अधिका-यांकडे १२ ते २२ केंद्रांची जबाबदारी सोपावली आहे.

मतदान यंञात तांञिक बिघाड व मार्गदर्शनसाठी ९ स्ट्राईंकिंग फोर्स, इव्हीएम नोडल अॉफिसर,२ इंजिनिअर,मास्टर ट्रेनर हे सर्व मतदान प्रक्रियेत लक्ष ठेवुन असतील.शिरुर हवेली विधानसभा क्षेञात एकुण ३ लाख ६९ हजार ८७२ इतकी मतदार संख्या असुन त्यापैंकी १ लाख ९३ हजार ७६ इतके पुरुष व १ लाख ७६ हजार ७९१ इतके महिला मतदार आहेत.तर पाच तृतीयपंथीय मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.शिरुर तालुक्यात २०५ मतदान केंद्रे असुन शिरुर तालुक्यात ९५ हजार ७१० इतके पुरुष मतदार तर ८९  हजार ६८० इतके स्ञी मतदार व इतर १ असे मिळुन एक लाख ८५ हजार ३९१ इतके मतदार आहेत.शिरुर शहरात ३२ मतदान केंद्रे असुन १४ हजार ५३६ इतके पुरुष व १४ हजार २०८ असे मिळुन २८ हजार ७४४ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

शिरुर तालुक्यात निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी २०५ मतदान केंद्रांवर एक उपविभागीय अधिकारी,तीन पोलीस निरीक्षक,११ पोलीस उपनिरीक्षक,११३ पोलीस कर्मचारी, १२८ होमगार्ड,राज्य राखीव दलाची एक तुकडी, शिघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती शिरुर पोलीसांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या