शिरूर तालुक्यात मतदानासाठी शेवटच्या तासात गर्दी

Image may contain: 11 people, people smiling, people standing

शिरूर, ता. 30 एप्रिल 2019 : शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता.29) घेण्यात आलेल्या मतदानावर उन्हाच्या चटक्‍याचा परिणाम झाला. उन्हामुळे मतदारांनी सकाळी व सायंकाळी मतदान करणे पसंत केले. परिणामी, दुपारच्या वेळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट जाणवत होता. सरासरी 58.04 टक्के मतदान झाले.

शेवटच्या तासात अनेक केंद्रांवर विक्रमी मतदान झाले. शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख 69 हजार 872 मतदार असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यातील एक लाख दहा हजार 771 पुरुष व 84 हजार 911 महिला असे मिळून एक लाख 95 हजार 683 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. सुरवातीला सकाळी चांगले मतदान झाले. मात्र, दुपारी मतदानात घट झाली. चारनंतर उन्हाची काहिली कमी झाल्याने अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. सहा वाजण्याच्या आत जे मतदान केंद्रात किंवा परिसरात आले, त्या सर्वांचे मतदान करून घेण्यात आले.

लोकसभेसाठी शिवसनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये चुरस असणार आहे. मतदारांनी आपला हक्क बजावला असून, 23 मे रोजी निकाल लागणार आहे. यामुळे शिरूरचा आगामी खासदार कोण असणार? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

तळेगाव ढमढेरे परिसरात सरासरी ६५ टक्के मतदान
तळेगाव ढमढेरे परिसरात मतदारांनी उत्साहात मतदान केले. अनेक मतदान केंद्राच्या बाहेर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. उन्हामुळे दुपारी मात्र बहुतांशी मतदान केंद्राच्या बाहेर शुकशुकाट होता. शिक्रापूरात ११ हजार ५८५ पैकी ७ हजार ३८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याठिकाणी ६३.७५ टक्के मतदान झाले तर तळेगाव ढमढेरे येथे सरासरी ६३ टक्के मतदान झाले. तळेगाव ढमढेरे परिसरात देखील सुमारे ६५ टक्के मतदान झाले आहे. तळेगाव ढमढेरे परिसरात तळेगाव ढमढेरेसह शिक्रापूर ,सणसवाडी, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, धानोरे, कासारी, निमगाव म्हाळुंगी, घोलपवाडी, माळवाडी, दहिवडी, पारोडी, कोंढापुरी आदी ठिकाणी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत तसेच चार वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या वेळी मात्र पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने मतदानाचे प्रमाण कमी होते. ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मातदानातील सहभाग लक्षवेधी होता. परिसरात मतदानाची टक्केवारी वाढली असून वाढलेल्या टक्क्याचा कुणाला फायदा होईल याच्या चर्चा मात्र आतापासून रंगू लागले आहेत.

निवडणूक मतदान टक्केवारी
लोकसभेच्या निवडणुकीच्या  चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार (दि २९) रोजी पार पडलं.शिरुरच्या पुर्वभागातील करडे,चव्हाणवाडी,लंघेवाडी,मोटेवाडी,निमोणे,
गुनाट, शिंदोडी, चिंचणी या प्रत्येक गावात कडक ऊन असुन सुद्धा नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी युवकांनी मोठया प्रमाणात मतदानाला हजेरी लावली.

गावनिहाय मतदान पुढीलप्रमाणे
करडे २९५५ पैकी २०६१ (६९.६७%)
चव्हाणवाडी ७०२ पैकी ४७९ (६५.८४%)
लंघेवाडी ७७३ पैकी ५०९ (६८.२३%)
मोटेवाडी ५४१ पैकी ४०३ (७५%)
निमोणे ३६१८ पैकी २३८८ (६९.६७%)
गुनाट १९३३ पैकी १३२१ (६८.३३)
शिंदोडी १२४७ पैकी ९३० (७४%)
चिंचणी १४६८ पैकी १०६० (७२.२८)शिरुर तालुक्यात पाच पर्यंत ५२.९१ टक्के मतदान
शिरुर, ता.२९ एप्रिल २०१९(सतीश केदारी) : शिरुर- हवेली विधानसभा क्षेञात सायंकाळी पाच पर्यंत ५२.९१ टक्के मतदानाची नोंद झाली असल्याची माहिती शिरुरचे तहसिलदार व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी गुरु बिराजदार यांनी दिली.

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoorसकाळी सातवाजलेपासुन शिरुर तालुक्यात मतदानास सुरुवात झाली.ठिकठिकाणी मतदारांचे मतदान केद्रांवर स्वागत करण्यात येत होते.शिरुर शहरात "सखी" हा विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आला होता.या मतदान केंद्रावर मतदान कक्ष अधिकारी,कर्मचारी, पोलीस म्हणुन फक्त महिलांनी काम पाहिले.सकाळी ग्रामीण भागासह शहरात मतदान करण्यासाठी नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.शिरुर शहरात दुपारी एक वाजता  उन्हाचा तडाखा असतानाही मुंबई बाजार,विद्याधाम प्रशाला, उर्दु शाळा या ठिकाणी गर्दी दिसुन येत होती.शिरुर शहरातील विद्याधाम प्रशाला जवळ पोलीसांनी नागरिकांना १०० मीटर परिसरात वाहने थांबु न दिल्याने पोलीस व नागरिकांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे दिसुन आले.शिरुर तालुक्यात सकाळी नउ वाजेपर्यंत ७.२३ टक्के व ११ वाजेपर्यंत १८.३५ टक्के मतदान झाले तर दुपारी एक पर्यंत ३१.६४ टक्के मतदान झाले असुन यामध्ये ७१५७६पुरुष व ४५४४४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख १० हजार ७७१ पुरुष,८४९११ महिला मतदारांनी एकुण १ लाख ९५६८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यावेळी सुमारे ५२.९१ टक्के मतदानाची आकडेवारी नोंद झाली असल्याची माहिती बिराजदार यांनी दिली.

शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदान चौथ्या टप्प्यात होते .राष्ट्रवादी सह शिवसेना बसपा ,शेतकरी संघटना ,बहुजन मुक्ती पार्टी सह एकूण २३ उमेदवार उभे आहेत . आमदार बाबूराव पाचर्णे यांनी तर्डोबाचीवाडी येथे सायंकाळी ५ वाजता मतदानाचा हक्क बजाविला तर माजी आमदार ॲड अशोक पवार व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सभापती सुजाता पवार यांनी वडगाव रासाई येथे तर शिरुर नगरपालिकेचे सभागृह नेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल त्यांच्या पत्नी दिना धारिवाल यांनी कापड बाजारातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. माजी आमदार काकासाहेब पलांडे यांनी मुखई मध्ये तर शेतकरी संघटनेचे शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार बाळासाहेब घाडगे यांनी इनामगांव येथे मतदान केले. टाकळी हाजी येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मतदानाचा हक्क बजाविला.शिरुर शहरात दुपारी एक वाजता  उन्हाचा तडाखा असतानाही मुंबई बाजार,विद्याधाम प्रशाला, उर्दु शाळा या ठिकाणी गर्दी दिसुन येत होती.शिरुर शहरातील विद्याधाम प्रशाला जवळ पोलीसांनी नागरिकांना १०० मीटर परिसरात वाहने थांबु न दिल्याने पोलीस व नागरिकांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे दिसुन आले.

शिरुर शहरात नागरिकांना मतदानाचे आवाहन करत शहरातील कॅफे कॉलेज कट्टा येथे शाईचे बोट दाखवा अन गरमागरम मिसळीसोबत कोल्ड कॉफी फ्री देण्यात येत होते.तर शिरुर शहरातील सुखकर्ता मेडिकल ला मेडिकलच्या खरेदीवर १० टक्के सुट देण्यात येत होती.रांजणगाव गणपती येथील संदिप हॉटेल वर जेवणावर १० टक्के सुट देण्यात येत होती.

ग्रामीण भागासह सर्वञ पोलीस, राज्य राखीव दलाचे कर्मचारी, मतदान केंद्रांतील भरारी पथक मतदानाच्या दरम्यान अनुचित प्रकार घडु नये म्हणुन लक्ष ठेवुन आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या