आमदाबादमध्ये तिघांचे मृतदेह पाहून मन हेलावले (Video)

Image may contain: fire, night, sky, outdoor and nature
आमदाबाद, ता. 30 एप्रिल 2019: आमदाबाद येथील भिल्ल वस्तीमध्ये सोमवारी (ता. 29) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झोपड्यांना लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तिघांचे मृतेदह पाहून अनेकांचे मन हेलावले.

या आगीत लालू आनंदा गावडे (वय 35), दादू लालू गावडे (वय 4 वर्षे) व बाई अरूण पवार (वय 3 वर्षे) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. उपाबाई लालू गावडे या किरकोळ भाजल्या आहेत. तिघांचे मृतेदेह पाहिल्यानंतर अनेकजण हळहळत होते. समोरील दृष्य पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला टाहो मन हेलावणारा होता.

आगीमध्ये किमान पाच झोपड़्या व संसारुपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आग लागली त्या वेळी अनेकजण मतदानासाठी बाहेर पडले होते. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा केला. तरीही आग भड़कतच होती. अखेर शिरूर येथून अग्नीशामक दलाच्या गाडीने ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. झोपड्यांना लागलेल्या आगीची माहिती ग्रामस्थांना समजताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिरूर येथून आलेल्या अग्नीशामक दलाने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रूग्णवाहिका येथे बोलावण्यात आले असून किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले.

या प्रकरणी उषा बाळू गावडे यांनी फिर्याद दिली आहे. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणा-या फिर्यादींसह अरुण फक्कड पवार, बारकुबाई फक्कड पवार हे जखमी झाले आहेत. या आगीत अरुण फक्कड पवार, गणेश फक्कड पवार, फक्कड गंगाराम पवार यांच्या झोपड्या पुर्णपणे जळून नुकसान झाले.  या वेळी नितीन थोरात, बांधकाम व्यावसायिक मदगे, खासगी टॅंकर तसेच औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक बंब यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या लागलेल्या आगीची वार्ता परिसरात समजताच सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह प्रदिप वळसे पाटील, पांडुरंग थोरात, गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

महिलेने फोडला टाहो...

या घटनेत पती, मुलगा अन् भावाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. हे सारं दुखः उराशी बाळगून पत्नी उपाबाई लालू गावडे या महिल्याच्या डोळ्यातील पाणी आटले होते. पण, मुलांचा मामा आल्यानंतर तिने टाहो फोडला. हे दृश्य पाहून अऩेकांना रडू कोसळले. दुष्काळी परीस्थीतीत मोलमजूरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करीत होते. या ठिकाणी पाच झोपड्या करून ते वास्तव्यास होते. पती लालू व उपाबाई या दांपत्याला पाच मुली व एक मुलगा. पाच मुलींवर त्यांना एका मुलाचे अपत्य झाले होते. मुली तलावावर पोहायला गेल्याने त्या बचावल्या आहेत.

वडीलांच्या प्रेमापोटी तोही गेला...
लालू यांना अपघातामुळे पायाला दुखापत झाली होती. त्याना जास्त चालता येत नव्हते. यामुळे आग लागल्यानंतर ते तत्काळ बाहेर येऊ शकले नसतील. वडीलांना बाहेर पडता येत नसल्यामुळे चिमुकलाही त्यांच्याजवळच थांबला. यामुळे वडीलांच्या प्रेमापोटी मुलाचाही जीव गेल्याच्या घटनेने परीसरातील नागरीकांनी हळहळ व्यक्त करत होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या