...म्हणून 'या' गावाने मतदानावर घातला बहिष्कार

शिरूर, ता. 2 मे 2019: आमदार, खासदार लोकप्रतिनिधी निवडणूक झाल्यानंतर गावाकडे परत फिरकतही नाहीत. म्हणून वरुडे (ता. शिरूर) या गावाने लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घातला.

वरुडे गावातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गल्या पाच वर्षांमध्ये कोणताही राजकीय नेत्याने या कामांकडे लक्ष दिले नाही. वरुडे ते वाघाळे, वरुडे ते चिंचोली मोराची, वरुडे ते गणेगाव खालसा या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी गावच्या विकास कामांकडे लक्ष देत नाहीत. वरुडे गावातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती गावचे माजी सरपंच संतोष भरणे यांनी दिली.

दरम्यान, वरुडे गावातील एकूण मतदान 1099 एवढे आहे. यापैकी केवळ 71 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या 71 मतदारांपैकी 25 मतदार हे पिंपरी दुमाला येथील आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या