भीमानदीत पाणी सोडल्याने शेतक-यांमध्ये समाधान

Image may contain: one or more people, outdoor and natureमांडवगण फराटा, ता. ५ मे २०१९ (वार्ताहर) : भीमानदी पाञात पाणी सोडल्याने शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.

शिरुर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस जाणवत असुन शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील भिमा नदी पाञातील असणारे कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता.काही बंधारे हे पाण्याअभावी कोरडे पडले होते.त्यामुळे    शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील  नागरगाव,रांजणगाव सांडस,वडगाव रासाई,सादलगाव,मांडवगण फराटा,गणेगाव दुमाला आदी  गावातील पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली होती.तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना विनंती करुन पुरंदर उपसा थोडे दिवस बंद ठेवून भिमा नदीत पाणी सोडण्याची विनंती केली होती.त्यावर शिवतारे यांनी ही विनंती मान्य करत पाटबंधारे खात्यातील अधिका-यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.मुंढवा जॅकवेलमधूनही पाणी सोडण्यासाठी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी प्रयत्न केले होते.पुरंदर उपसा व मुंढवा जॅकवेलमधून पाणी सोडल्यामुळे या पाण्याचा फायदा शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना होणार असुन त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.आमदार बाबूराव पाचर्णे यांनी मुंढवा जॅकवेलमधून सुटणा-याच्या पाण्याची पाहणी केली,यावेळी त्यांनी १००० क्सुसेसने पाणी सोडण्यात आले असून लवकरच पाणी शेतकऱ्यांना मिळेल असे सांगितले.

यावेळी घोडगंगा  कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, श्याम आप्पा चकोर,लक्ष्मण फराटे, गोविंद  फराटे, बाळकाका फराटे,  आत्माराम फराटे, संभाजी  फराटे, प्रभाकर  घाड़गे,रावसाहेब जगताप,बिभिषण फराटे आदींनी भिमानदीत पाणी सोडवावे यासाठी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. पाणी लवकर खाली जावे म्हणून नदीपट्ट्यातील गावांचा विद्यूत पुरवठा काही काळ खंडीत करण्यात येणार आहे.आमदारांनी शेतक-यांच्या मागणीची दखल घेत शब्द पुर्ती केल्यामुळे मांडवगण फराटा व परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या