महागणपतीला 501 शहाळ्यांचा प्रसाद; आंब्यांची आरास

Image may contain: indoor
रांजणगाव गणपती, ता. 9 मे 2019: श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील अष्टविनायक महागणपतीला प्रगतीतील शेतकरी आनंदराव पाचुंदकर यांच्यातर्फे विनायक चतुर्थीनिमित्त बुधवारी (ता. 8) 501 शहाळ्यांचा (ओला नारळ) प्रसाद देण्यात आला. यावेळी त्यांनी महागणपती समोर गणेश सहस्त्र नामावली पठण करून शहाळे अर्पण केले. यावेळी महागणपतीला अर्पण केलेल्या शहाळ्यांची आकर्षक आरास केली होती. शहाळ्यांचा गणेश भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.

रांजणगावच्या महागणपती ला ११ हजार आंब्यांची आरास
No photo description available.रांजणगाव गणपती,ता.७ मे २०१९ (प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती  येथील श्री महागणपती ला अक्षय तृतीयेचे औचित्य साधून ११ हजार आंब्यांची व मोगऱ्याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे.

हिंदू धर्म संस्कृती व रूढी परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेनिमित्त दरवर्षी देवस्थान च्या वतीने श्री महागणपती ला आंब्यांची आरास केली जाते. त्यानुसार यावर्षी "श्रीं"ना आंब्याच्या नैवेद्य दाखविण्यात आला.पुजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी यांनी श्री महागणपतीला आंब्यांची आरास केली. यावेळी देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी  देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या