लोकसभेचा प्रचार संपला अन् झाले नेते नॉट रिचेबल

Image may contain: 1 person, smiling
शिरूर, ता. 9 मे 2019:
शिरूर लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेते मतांसाठी गावोगाव फिरून हात जोडताना दिसत होते. मात्र, प्रचार संपला अन् नेते नॉट रिचेबल झाल्याची चर्चा शिरूर तालुक्यात सुरू झाली आहे.

शिरूर तालुक्यात सध्या पाण्याचा चाऱयाचा गंभीर प्रश्न उभा आहे. गेला महिनाभर प्रचारादरम्यान नेते गावोगाव भेटी देताना मोठमोठी आश्वासने देत होते. नागरिकांच्या संपर्कात होते, हात जोडत होते. परंतु, मतदान झाले अन् नेते नॉट रिचेबल झाले आहेत.

निवडणूका जवळ आल्या की नेत्यांना सर्वसामान्य नागरिकांचा, गावांचा कळवळा यायला लागतो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतात. मात्र, हा देखावा केवळ मतदान होईपर्यंतच पहायला मिळतो. निवडणूक कोणतीही असली तरी नेते फक्त मतदान मागण्यासाठीच येताना दिसतात. परत, मात्र फिरकतही नाहीत. हे चित्र नेहमीच झाले आहे. एकदा निवडणूक झाली की नेत्यांचे दर्शन दुर्मिळ होते. या कारणामुळेच वरूडे गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

शिरूर तालुक्यातील सर्व प्रश्न संपले आहेत का? प्रचारानंतरही नेते सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटते जरूर व्यक्त व्हा....

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या