शिरूर लोकसभेतील 'ईव्हीएम'च्या स्ट्राँगरूमला सुरक्षेचे कडे

No photo description available.
शिरूर, ता. 10 मे 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन (मतदान यंत्रे) बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील स्ट्रॉँग रूममध्ये ठेवण्यात आली असून, २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सुरक्षेचे कडे स्ट्राँगरूमला असणार आहे. एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत.

शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्णत्वास आली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. केंद्रीय राखीव पोलिस, राज्य राखीव पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस असे तीन टप्पे आहेत. तीनही ठिकाणी तपासणी केली जाते. सर्वप्रथम महाराष्ट्र पोलिस ओळखपत्राची तपासणी करतात. त्या पुढे राज्य राखीव पोलिसांकडून यंत्रांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. केंद्रीय राखीव पोलिस दलातर्फे मोबाइल व इतर वस्तूंची तपासणी केली जाते. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी कक्षात कोणालाही मोबाइल आतमध्ये नेण्यास परवानगी नाही. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी कोणीही मोबाइल आतमध्ये नेऊ शकत नाही.

प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी, रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी असणार आहेत. मतमोजणी कर्मचाऱयांना १६ आणि २२ मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोस्टल मतदानासाठी आठ टेबल अशा एकूण ९२ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एका टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी एका टेबलवर असतील.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या