शिरूर तालुक्यात दोन गावांमध्ये छावण्यांना मंजुरी

Image may contain: one or more people and outdoor
केंदूर, ता. 14 मे 2019 (विशाल वर्पे): चारा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शिरूर तालुक्यात दोन चारा छावण्यांना सरकारने मंजुरी दिली आहे, केंदूर आणि कान्हूर मेसाई (ता. शिरूर) या दोन गावामध्ये छावण्या असणार आहे, अशी माहिती शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी प्रभातला दिली आहे.

दुष्काळाची तीव्रता गेल्या तीन ते चार महिन्यापासून जाणवत असल्याने केंदूर परिसरात पाण्याची भीषण टंचाई भासू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केंदूरच्या शेतकऱ्यांनी चारा छावणीची आणि टँकरची मागणी केली होती टँकरने मिळणाऱ्या पाण्यातून उर्वरित जनावरांची तहान भागात नव्हती त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतीच चारा छावणीला मंजुरी दिली आहे. एका छावणीमध्ये तीन हजार जनावरे सहभागी करता येणार आहेत, मोठ्या जनावराला ९० तर लहान जनावराला ४५ रुपयांचे प्रतिदिवस सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या जनावरांना १८ किलो चारा तर लहान जनावरांना ९ किलो चारा आणि दूध देणाऱ्या जनावरांना पेंड, सुग्रास देण्यात येणार आहे.

या छावणीचे सर्व कारभार मोबाईल अपद्वारे ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. प्रत्येक जनावरांना विशिष्ट प्रकारच्या टॅग लावून रोजच्या रोज याचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे. केंदूर आणि कान्हूर मेसाई येथे चारा छावणी चालवण्याची जबाबदारी इनामगावच्या 'राधेश्याम महिला बचतगट' या संस्थेला देण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या