शिरूर तालुक्यातील युवक अन् तू माझ्या दिलाची राणी... (Video)

Image may contain: 22 people, people smiling, people standing and outdoor
शिक्रापूर, ता. 16 मे 2019: शिरूर तालुक्यातील काही युवकांनी एकत्र येत एका मराठी गाण्याची निर्मिती केली असून, युवकांचे गाणे चित्रफितीच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

शिक्रापूरसह परिसरातील तेळेगाव ढमढेरे, पिंपळे खालसा, बुरुंजवाडी, टाकळी भीमा येथील युवकांनी एकत्र येत स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर मराठी गाणे तयार केले आहे. सदर गाण्याचे बोल 'तू माझ्या दिलाची राणी...' असे असून हे गाणे रुपेश बोरुडे याने लिहिले आहे. प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी हे गाणे गायले आहे तर या गाण्याला संदीप रोकडे व योगेश कांबळे यांनी संगीत दिले आहे. या गाण्यामध्ये शेरखान शेख, प्राची पालवे यांनी मुख्य अभिनय केला असून सह कलाकार म्हणून रुपेश बोरुडे, आयुब शेख, विक्रम दुपारगुडे, सचिन कांबळे, समृद्धी गिरमकर, सना पठाण, रंगोली वाघ, आरजू शेख, तुषार रणसिंग, अक्षय उल्हाळकर, प्रमोद भैरवकर यांनी भूमिका बजावली आहे. या गाण्याची निर्मिती शेरखान शेख व आयुब शेख यांनी केली आहे.


Image may contain: 3 people, people smiling, textया गाण्याचे चित्रीकरण शिरूर तालुक्यातील धानोरे, शिक्रापूर तसेच हवेली तालुक्यातील बुर्केगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मुलांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. परंतु, आपणच काही करून मुलांच्या कला गुणांना वाव द्यावा यासाठीचा आम्ही केलेला हा प्रयत्न असल्याचे यावेळी बोलताना सदर गाण्याचे निर्माते शेरखान शेख व आयुब शेख यांनी सांगितले. येत्या काही दिवसामध्ये आमचे गाणे टीव्ही वर प्रदर्शित होत असल्याचा आनंद वाटत असल्याचे सर्व कलाकारांनी सांगितले आहे.

दरम्यान, शेरखान शेख एक व्यवसायिक असून कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतः पत्रकार, सर्पमित्र आहेत, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना यापुर्वी अनेक पुरस्कार मिळालेले असून, सध्या अभिनयाकडे वाटचाल करुन इच्छा असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या