पुणे-नगर मार्गावरील कासारी फाट्यावर पती-पत्नीला उडवले

Image may contain: 1 person, text

निमगाव म्हाळुंगी, ता. 17 मे 2019: पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे भरवेगात असलेल्या मोटारीने दुचाकीला उडवले. दुचाकीवर असलेल्या पती-पत्नीला काही अंतर फरफटत नेले. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी उत्तम तागड हे पत्नी अलका यांच्यासह शिक्रापूर येथे गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ते गावाकडे परतत होते. यावेळी पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने तागड यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली व दोघांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये अलका तागड (वय 45) यांचा मृत्यू झाला असून, उत्तम तागड यांची प्रकृती गंभीर आहे. उत्तम तागड यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मोटार चालक वाहन घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

अलका उत्तम ताकड यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली. स्वभावाने मनमिळावून असल्यामुळे त्यांचे सर्वांशी आपुलकीचे नाते होते. त्यांचे अचानक जाण्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

कासारी फाटा घेणार किती जणांची बळी?
पुणे-नगर रस्त्यावरून निमगावकडे जाण्यासाठी कासारी फाट्यावरून जावे लागते. महामार्गावरील वाहने वेगात असल्यामुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. किती बळी गेल्यानंतर प्रशासनला जाग येणार आहे, असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या