शिरुरला अमोल कोल्हे यांची मोठ्या मताधिक्याने मुसंडी

Image may contain: 2 people, beardशिरुर,ता.२३ मे २०१९(सतीश केदारी) : शिरुर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होत असुन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी करिष्मा कायम ठेवत मतांची मोठी मुसंडी मारली आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघातून दुपारी पावणे दोन वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर या चार तालुक्यात आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भोसरी व हडपसर मतदार संघातून आघाडीवर आहेत.
  डॉ. अमोल कोल्हे शिरूर मध्ये १९ व्या फेरी अखेर १९ हजार ६८०, आंबेगाव मधून २२ व्या फेरी अखेर २२हजार ६३६, जुन्नर मधून १८ व्या फेरी अखेर ३३ हजार, खेड मधून २२ व्या फेरी अखेर चार हजार मतांनी आघाडीवर आहे. तर आढळराव पाटील भोसरी मध्ये २४व्या फेरी अखेर २४हजार मतांनी व हडपसरमध्ये २३व्या फेरी अखेर ६ हजार ३००मतांनी आघाडीवर आहेत. एकंदरीत डॉ. कोल्हे हे सद्यस्थितीत ४९ हजार ३१६ मतांनी आघाडीवर आहेत.

दहाव्या फेरी अखेर कोल्हे यांना २५,९४० इतके मताधिक्य मिळाले आहे. आढळराव यांना दोन लाख १ हजार ७३९, तर कोल्हे यांना दोन लाख २७ हजार ६७९ मते मिळाली आहे.

शिरुर लोकसभेच्या निवडणुक निकालात पहिल्या फेरीत चार तालुक्यात निकाल हाती आलेला असुन कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.शिरुर लोकसभा मतदारसंघात हडपसर व भोसरी या दोन्ही मतदारसंघात दुस-या फेरी अखेर अनुक्रमे १२०० व २४०० मतांची आघाडी शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांनी घेतली आहे.तर खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरुर मधुन डॉक्टर अमोल कोल्हे हे आघाडीवर असल्याचे समजते.

हाती आलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे :
डॉ.अमोल कोल्हे : २२७६७९
शिवाजी आढळराव पाटील : २०१७३९
राहुल ओव्हाळ :
अमोल कोल्हे २५९४० मतांनी आघाडीवर

शिरुर लोकसभेत प्रथमच तडगं आव्हान निर्माण होउन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व अभिनेते अमोल कोल्हे यांची पहावयावस मिळाली.शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात ६१.५२ टक्के इतके मतदान झाले आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकित शिरुर हवेलीतुन ५९.६० टक्के इतके मतदान झाले होते.शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी एकुण ३ लाख ६९ हजार ८७२ एवढे मतदार आहेत.मागिल वर्षीच्या निवडणुकिच्या तुलनेत यावेळेस २ टक्के मतदान वाढलेले आहे.साधारण वाढलेले जे चाळिस हजार मतदान आहे,हे कोणाच्या पारड्यात मतदान पडणार यावर या निवडणुकिचे बरेचसे  चिञ अवलंबुन आहे.मागील निवडणुकित शिवसेनेचे शिवाजीराव आढ़ळराव पाटील हे तीन लाखांपेक्षा जास्त अधिक मताने निवडुन आले होते.

प्रशासनाने शांततेत मतमोजणी पार पाडावी यासाठी कंबर कसली असुन सकाळी ८ वाजलेपासुन मतमोजणीस प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.शिरुर लोकसभेची मतमोजणी बालेवाडी येथे पार पडत  असुन शिरुर लोकसभेतील एकुण ६ तालुक्यात २२९६ मतदान केंद्रे असुन २१ लाख ७३ हजार ४८४ मतदारांपैकी १२ लाख ९२ हजार ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन शिरुर लोकसभेतील मतदार संघांतील ८४ टेबल मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

शिरुर लोकसभेत गेल्या तीन टर्म ला निवडुन येणा-या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा तळागाळातील जनतेशी असलेले नाते हे प्लस पॉइंट असुन "खासदार शिवाजी आढळराव पाटील चौकार मारणारच" असा विश्वास शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे तर  त्याविरुद्ध प्रथमच अमोल कोल्हे यांच्या रुपाने राष्ट्रवादीने तगडं आव्हान निर्माण केले असुन "आमचं ठरलयं-खासदार अमोल कोल्हेच" असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडुन व्यक्त केला जात आहे.त्यामुळे शिरुर लोकसभेत कोण विजयी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या