शिरुरला 'अभिनेत्याने' केली 'नेत्यावर' मात

Image may contain: 3 people, people standing, beard, hat and glassesशिरुर, ता. २३ मे २०१९ (सतीश केदारी) : पुणे जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ.अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव करत प्रथमच शिरुर मतदारसंघात इतिहास घडविला आहे.

शिरुर लोकसभेची निवडणुक हि उमेदवारी जाहिर होण्यापुर्वीपासुन गाजली ती मातब्बर नेत्यांच्या वक्तव्याने.राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी उमेदवारीबाबत भाष्य केलं होतं.त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खासदार आढळराव पाटील यांच्याविरोधात लढण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला होता.या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी,माझ्याकडे सक्षम ४-५ उमेदवार असल्याचे सांगत उमेदवारीबाबत सर्वांनाच गुलदस्त्यात ठेवले होते.यानंतर एकेकाळी शिवसेनेत असलेले डॉ.अमोल कोल्हे यांना उभे करत एकप्रकारे राजकारणाच्या खेळात गुगली टाकली.या नवख्या उमेदवारीमुळे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समेट घडविला व त्यानुसार शिरुर लोकसभेत इच्छुक असलेल्या मातब्बर बंडोंबांना थंड करत एकदिलाने लढण्याचे ठरले.त्यानुसार इच्छुकांनीही झाले-गेले विसरुन एकदिलाने प्रचार केला.त्याचाच परिणाम प्रचारात पहावयास मिळाला.

शिरुर लोकसभेत डॉ.कोल्हेंना उमेदवारी मिळताच सर्वांनी जोरदार प्रचार सुरु केला.प्रचारात सुरुवातीला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वरचष्मा होता.परंतु हळुहळु आढळराव यांची प्रचारात पिछाडी पहावयास मिळत होती.त्यातच जातीचा फॅक्टर व पंधरा वर्षात केलेली विकासकामे यांचेही मुद्दे गाजत होते.या विरुद्ध अभिनेते अभिनेते असलेले अमोल कोल्हे यांची स्वच्छ प्रतिमा तसेच प्रचारात निर्माण केलेला झंजावात,मालिकेतील असलेली प्रतिमा यामुळे याचा फायदा कोल्हे यांना झाला.

शिरुर लोकसभा मतदार संघात खेड,जुन्नर,आंबेगाव,हडपसर,भोसरी,शिरुर या तालुक्यातुन एकञित मिळुन अमोल कोल्हे यांनी मतमोजणीच्या सर्व फे-यात सुरुवातीपासुन पकड ठेवत अखेर विजयाचा झेंडा रोवला.सलग तीन टर्म निवडुन येणा-या शिवसेनेच्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वारु रोखला.अमोल कोल्हे यांच्या विजयावरुन शिरुर लोकसभेत राष्ट्रवादीला अभुतपुर्व यश मिळाले असुन आढळराव पाटील यांच्याविरोधात सुप्त लाट होती का ? याबाबत ठिकठिकाणी चर्चा रंगु लागल्या आहेत.

एकोणिसाव्या फेरीअखेर शिरुर लोकसभा मतदारसंघाचा निकाल
डॉ.अमोल कोल्हे : ४,४०,८६९ मते
शिवाजी आढळराव पाटील : ४,००,१५८
अमोल कोल्हे ४०,७११ मतांनी विजयी

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या